शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

महिलांनी नाकारले कर्जाचे हप्ते

By admin | Updated: November 16, 2016 00:56 IST

परसोडी (टेंभरी) येथील महिला मजुरांना मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज वाटप केले. या कंपन्या

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : ५००, १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकारविरूळ (आकाजी) : परसोडी (टेंभरी) येथील महिला मजुरांना मायक्रो फायनान्स कंपनीने कर्ज वाटप केले. या कंपन्या कर्जदारांकडून पंधरवाडी वसुली करीत होत्या; पण ८ नोव्हेंबरपासून त्यांनी ५००, १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे महिलांनी सदर कंपन्यांना कर्जाचे हप्ते न भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.एकविटास, इसाम, इनो, संग्राम. ग्रामीणा कुटा, एसकेएस, उत्कर्ष, जनलक्ष्मी, अर्बन, इंटरफिट आणि एलएनटी या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी परसोडी (टेंभरी) गावातील महिला मजुरांना कर्जवाटप केले. मागील महिन्यापर्यंत ते दर महिन्यात पंधरवाडी नियमानुसार कर्ज वसुली करीत होते; पण ५०० व १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर त्यांनी त्या नोटा स्वीकारण्यास साफ नकार दिला. मजूर महिला कर्जाची परतफेड करण्यास तयार असताना त्यांनी ते स्वीकारले नाही. यावरून या कंपन्यांकडे काळा पैसा असल्याचे लक्षात येते. यामुळे गावातील सर्व महिलांनी एकत्रितपणे कुठल्याही रकमेची परतफेड न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांचे प्रतिनिधी पैसे नेत नसल्याने त्या रकमेचे व्याज व रक्कम वाढत आहे. सर्व महिला शेतमजूर असून त्या कामाला जाऊन पैसे गोळा करतात. सात दिवसांची मजुरीची रक्कम एकत्र जमा झाल्यानंतर कर्जाचे हप्ते भरतात; पण ते घेण्यास नकार दिला जात आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून नवीन नोटा मिळण्यास अडचण जात असल्याने मजूर महिलांना जुन्या नोटांशिवाय पर्याय नाही. कंपन्यांच्या तगाद्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. यामुळे सदर कंपन्यांवर कारवाई करावी, ५००, १००० च्या नोटा स्वीकाराव्या वा कर्ज माफ करावे, अशी मागणी महिलांनी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)मायक्रो फायनान्सचा आवळतोय फासग्रामीण नागरिक, शेतकरी, शेतमजुरांच्या गळ्याभोवती सध्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा फास आवळत असल्याचे दिसून येत आहे. कर्जाचे वाटप करून जबरीने वसुली केली जाते. यासाठी अर्वाच्च भाषेचा वापर करीत महिलांना त्रस्त केले जाते. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये धडकी भरली आहे. असे असताना प्रशासकीय स्तरावर कारवाई होताना दिसत नाही. किमान या निमित्ताने तरी सदर कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांतून होत आहे....अन् शाखाधिकाऱ्यालाच सांगितले ‘तिकडे विचारा’नाचणगाव - सध्या गर्दीचा हंगाम सुरू आहे आणि ती गर्दी केवळ बँकेतच बघायला मिळत आहे. कुठे लोटालोटी तर कुठे तंटे, अशा विविध घटना घडत आहेत. अशातच कुठे हास्यकल्लोळही पाहावयास मिळतो. अशीच एक घटना स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेत घडली आणि ‘टेंशन’मध्येही हशा पिकला. बँकेत गर्दी असताना आजच्या क्षणी एकच कर्मचारी नागरिकांना दिसतो आणि तो म्हणजे रोखपाल! या रोखपालाकडे रकमेचे वितरण धनादेश वा पासबुकच्या माध्यमातून करण्याचे काम आहे. यातच किती पैसे मिळणार व इतरही प्रश्नांचा नागरिक भडीमार करतात. यावर ते एकच उत्तर देतात, ‘तिकडे विचारा’. हे उत्तर देताना ते कामात व्यस्त राहत असल्याने मानही वर करीत नाही. ‘तिकडे विचारा’ म्हणजे शाखाधिकाऱ्यांना विचारा, असे ते उत्तर असते. व्यस्त कामांच्या दिवसांत असे कित्येक वेळा घडते. अशातच शाखाधिकाऱ्यांना काम पडले आणि त्यांनाही या उत्तराचा सामना करावा लागला. यावेळी रांगेत एकच हशा पिकला. यानंतर रोखपालाला आपण कुणाला बोललो ते कळले आणि तेही हसू आवरू शकले नाही. कामाच्या ताणात, असे किस्से एक वेगळाच आनंद देऊन जातात, हे मात्र खरे!