शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

मक्त्याच्या शेतीतून उभा केला महिलांनी संसार

By admin | Updated: June 4, 2015 01:52 IST

महिलांनी उद्योग उभारणे ही बाबच आजही पुरुषांच्या पचनी पडलेली नाही. त्यातही काही महिलांनी उद्योग उभारण्याचा विडा उचललाच तर फार फार तर लोणची, पापड ...

पराग मगर वर्धामहिलांनी उद्योग उभारणे ही बाबच आजही पुरुषांच्या पचनी पडलेली नाही. त्यातही काही महिलांनी उद्योग उभारण्याचा विडा उचललाच तर फार फार तर लोणची, पापड यापुरते ते मर्यादित राहतात किंवा ठेवले जातात. त्यातच कृषी हे क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. स्त्रिया केवळ मजुरीचीच कामे करतात. पण ही मक्तेदारी मोडीत काढत बचत गटाच्या माध्यमातून मक्त्याने शेती करून आपल्या संसार उभारण्याची किमया मातोश्री मालिनी महिला मंडळद्वारे अक्षर संयुक्त देयता गटाद्वारे बोरगाव (आलोडा) येथील पाच महिलांनी करून दाखविली.मंगला राऊत, वैशाली कराळे, वंदना पवार, कुसूम टिपले आणि भाग्यश्री झामरे अशी या महिलांची नावे आहेत. शेतीच सध्या परवडेनाशी झाल्याची वल्गना केली जाते. त्यातही मक्त्याची शेती करणारे हे पुरुषच असतात. परंतु शेतीच्या कामाची सवय असलेल्या बोरगाव (आलोडा) येथील या पाच जणींनी नाबार्ड प्रकल्पांतर्गत मातोश्री मालिनी महिला मंडळ वर्धा द्वारा अक्षर संयुक्त देयता गट, बोरगाव (आलोडा) ची स्थापना केली. आणि गटांतर्गत मक्त्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दर महिन्याला १०० रुपयांची बचत जमा करण्याचा निर्णय घेतला. नाबार्डच्या सहाय्यक महाप्रबंधक डॉ. स्नेहल बन्सोड व योगिनी शेंडे यांनी गट कशाप्रकारे चालवावा व मक्त्याची शेती करताना कोणकोणत्या अडचणी येतात तसेच त्या कशा हाताळाव्या याबाबत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे आर्थिक बाबतीत आलेले जिकरीने प्रश्न कसे नेटाने सोडवावे याची माहिती दिली. सर्वप्रथम त्यांनी बॅँक आॅफ इंडिया, बोरगाव (मेघे) या शाखेतून ३१ डिसेंबर २०१३ रोजी ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. यातून मक्त्याने शेती घेऊन त्यात गहू, हरबरा आदी पिके घेतली. पाचही जणी मिळून शेतात राबायच्या. यात त्यांना बँकेच्या कर्जाची परतफेड करून १० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे त्यांची हिंम्मत वाढली. त्यांनी पुन्हा साडेचार एकर शेती मक्त्याने करून त्यात कापूस व तुरीची लागवड केली. याकरिता बँकेने त्यांना ७० हजारांचे कर्ज दिले. या काळात बियाणे व खतांचे भाव वधारले. पावसानेही दगा दिल्याने दुबार पेरणी करावी लागली. तरीही हिमतीच्या जोरावर पिकांची मशागत केली. पिकांवर रोग पसरल्याने उत्पन्नात घट झाली. या काळात जोमाने कार्यकरण्यासाठी डॉ. बन्सोड यांनी खूप धीर दिल्याचे या पाचजणी सांगतात. हंगामात माल निघाल्यानंतर १५ क्विंटल कापूस व आठ क्विंटल तुरी झाल्या. मालाचे भाव पडल्याने त्यांना नुकसान सोसावे लागले. यात गटाला नफा मिळाला नाही. परंतु हिम्मत हारली नसल्याचे त्या सांगतात. तसेच पुन्हा मक्त्याची शेती करणार असल्याचेही हिमतीने सांगतात. कुठलेही तारण नसताना या पाच जणींनी हिमतीच्या जोरावर ही मक्त्याची शेती करून दाखवित जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. सुरुवातीला त्रास झालाआतापर्यंत शेतात मजुरी करीत असल्याने शेतीच्या कामाची जाण होती. नफ्या तोट्याचीही जाणीव होती. प्रत्यक्ष शेती करताना मात्र दिव्यातून जावे लगले. शेतीतून नुकसानच होते अशा अनेकांच्या भावना असल्याने तणाव होतात. परंतु सर्व संकटांना सामोरे जात त्यांनी पुरुषी मक्तेदारी मोडीत काढत मक्त्याची शेती करून दाखविली. आता हिम्मत वाढल्याचेही त्या गर्वाने भावना व्यक्त करतात.