शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कॉम्प्रेसरच्या स्फोटात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:10 IST

आजंती येथील श्रेयस पॅकेजींग इंडस्ट्रीजमध्ये (खर्डा फॅक्टरी) आकस्मिकरित्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देआजंती औद्योगिक वसाहतीमध्ये खर्डा फॅक्टरीमधील घटना

आॅनलाईन लोकमतवर्धा : आजंती येथील श्रेयस पॅकेजींग इंडस्ट्रीजमध्ये (खर्डा फॅक्टरी) आकस्मिकरित्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. रेखा तडस (४५) रा. सेंट्रल वॉर्ड हिंगणघाट, असे मृत महिला कामगाराचे नाव आहे.शहरानजीक नागपूर मार्गावर आजंती औद्योगिक वसाहतीत आजंती येथील उपसरपंच राजेश कोचर यांची खर्ड्याचे कोन बनविण्याची फॅक्टरी आहे. रेखा रमेश तडस ही महिला कामगार तेथे कार्यरत आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती आपल्या कामावर आली. खर्ड्याच्या ‘कोन’ची पॅकींग करीत असताना तिच्या काही फुट अंतरावरील हवेच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. कॉम्प्रेसर फुटल्यानंतर लोखंडाचा अवजड तुकडा उडून डोक्याला लागल्याने ही घटना घडली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

व्यवस्थापनाद्वारे साडेसात लाखाची मदतही घटना घडल्यानंतर मृतक रेखा तडस हिचे शव हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे मृतकाच्या कुटुंबियांनी भरपाई म्हणून २५ लाख रुपयांची मागणी केली. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढल्यावर व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबीयांना साडेसात लाख रुपये देण्याचे मान्य केले. यावेळी न.प. अध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरसेवक धनंजय बकाणे, देवा कुबडे, नरेश इवनाते, रूपेश लाजूरकर तसेच व्यवस्थापनातर्फे बिपीन पटेल व बबन कोचर यांची उपस्थिती होती. यावेळी खा. रामदास तडस व आ. समीर कुणावार यांनी दवाखान्यात येऊन मृतकाच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

कुटुंबीयांना दिलासामृतक कामगार रेखाचे पती रमेश तडस हे मोहता सुतगिरणीत कापड खात्यात कामगार होते. कामगार कपातीत त्यांची नोकरी गेल्याने ते बेरोजगार झाले. यामुळे पतीसह तीन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी रेखा तडस यांच्यावरच होती. त्यांच्या नोकरीवरच संसाराचा गाडा ओढला जात होता. व्यवस्थापनाने त्वरित ७ लाख ५० हजार रुपयांची मदत त्या कुटुंबाला केली. यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटAccidentअपघात