शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटच्या ‘नॅनो पार्क’मधील घरात सुरु होता ‘देहविक्री’ व्यवसाय; २ आरोपींसह एका महिलेस अटक

By चैतन्य जोशी | Updated: March 23, 2023 18:24 IST

क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई

वर्धा : हिंगणघाट शहरातील शाहलंगडी परिसरात एका घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायावर क्राईम इंटेलिजन्स पथकाने छापा मारला असता तिन्ही आरोपी एका महिलेकडून आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करवुन घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीसह एका महिला आरोपीस अटक केली. ही कारवाई क्राईम इंटेलिजन्स पथकाकडून २२ रोजी रात्री करण्यात आली. पोलिसांनी मंगेश दिलीप सुके, उमेश नारायण कोटकर व एका महिलेला अटक करुन त्यांच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

हिंगणघाट शहरात एका ठिकाणी अवैधरित्या देहव्यापार सुरु असून एक महिला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुली व महिलांकडून पैशाचे आमिष देत ग्राहकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करुन महिला व मुलींकडून देहविक्री व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीवरुन क्राईम इंटेलिजन्स पथकाने हिंगणघाट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांना माहिती देत त्यांच्या मदतीने शाहलंगडी रोडवर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायावर छापा मारला असता देहविक्रीचा व्यापार सुरु असल्याचे उजेडात आले. पोलिसांनी दोन आरोपींसह एका महिलेस अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबोळकर, सागर भोसले, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.

बनावट ग्राहक पाठवून केला उलगडा...

पोलिसांनी शाहलंगडी रस्त्यावर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरी पाठविले. दरम्यान त्या बनावट ग्राहकाला तिन्ही आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे दिसून आले. आणि पोलिसांनी छापा मारुन देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करीत उलगडा केला.

महागड्या कारमधून आणत होते ग्राहक

आरोपी मंगेश दिलीप सुके हा त्याच्या एम.एच. ३१ डी.एक्स. ५२ या महागड्या कारमध्ये ग्राहकांना बसवून नॅनो पार्कमधील घरी नेत होता. त्यांच्याकडून भक्कम रक्कम उकळून पीडित महिलांकडून देहव्यापार करवून घेत होता. पोलिसांनी आरोपींकडून पाच महागडे मोबाईल, एक महागडी कार, १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १० लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बनावट ग्राहक पाठवून केला उलगडा...

पोलिसांनी शाहलंगडी रस्त्यावर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरी पाठविले. दरम्यान त्या बनावट ग्राहकाला तिन्ही आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे दिसून आले. आणि पोलिसांनी छापा मारुन देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करीत उलगडा केला.

महागड्या कारमधून आणत होते ग्राहक

आरोपी मंगेश दिलीप सुके हा त्याच्या एम.एच. ३१ डी.एक्स. ५२ या महागड्या कारमध्ये ग्राहकांना बसवून नॅनो पार्कमधील घरी नेत होता. त्यांच्याकडून भक्कम रक्कम उकळून पीडित महिलांकडून देहव्यापार करवून घेत होता. पोलिसांनी आरोपींकडून पाच महागडे मोबाईल, एक महागडी कार, १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १० लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसायwardha-acवर्धा