लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बोगस बियाण्यांमुळे यंदा सोयाबीन अद्याप फुलावर नसतानाच अतिपर्जन्यमानामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या प्रकाराची चौकशी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यात मोठया प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली. पेरणीवेळी अनेक कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. पावसामुळे पिके जोमात बहरली आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा असतानाच सोयाबीनवर खोडकिडीने आक्रमण केले आहे. दुसरीकडे बोगस बियाण्यांमुळेच फुले आणि शेंगांची धारणा झाली नसल्याचा सरसकट अंदाज शेतकऱ्यांनी बांधला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांचे अनुदान देण्याची मागणी कृषिमंत्र्यांना करण्यात आली आहे. निवेदनावर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत इंगळे तिगावकर, भाजपचे सरचिटणीस मिलिंद भेंडे, विवेक भालकर, जयंत येरावार, प्रमोद वरभे, पं. स. सभापती महेश आगे, अतुल देशमुख, गणेश वांदाडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन फुलांविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST
जिल्ह्यात मोठया प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली. पेरणीवेळी अनेक कंपन्यांचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. पावसामुळे पिके जोमात बहरली आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच सोयाबीनवर खोडकिडीने आक्रमण केले आहे. दुसरीकडे बोगस बियाण्यांमुळेच फुले आणि शेंगांची धारणा झाली नसल्याचा सरसकट अंदाज शेतकऱ्यांनी बांधला आहे.
बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन फुलांविनाच
ठळक मुद्देकिडींचाही प्रादुर्भाव । हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदानाची किसान मोर्चाची मागणी