शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
7
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
8
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
9
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
11
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
12
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
13
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
14
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
15
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
16
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
17
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
18
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
19
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
20
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

बुद्धिमत्ता कुठे पण जन्माला येते

By admin | Updated: April 22, 2017 02:40 IST

ग्रामीण, आदिवासी, दुर्गम क्षेत्रातील कुटुंबात जन्मलेल्या बालकास शिक्षकांमुळे दर्जेदार शिक्षण व सकारात्मक दृष्टी

कल्याणकुमार डहाट : शिक्षक गुणगौरव सोहळा गोंदिया : ग्रामीण, आदिवासी, दुर्गम क्षेत्रातील कुटुंबात जन्मलेल्या बालकास शिक्षकांमुळे दर्जेदार शिक्षण व सकारात्मक दृष्टी मिळून अध्ययन व अध्यापन सुकर झाल्यास सुजाण पिढी निर्माण होते. यातून आदर्श नागरिक, कर्तृत्ववान अधिकारी निर्माण होतात. म्हणजेच बुद्धिमत्ता कोणत्याही क्षेत्रातील कुटुंबात जन्म घेते, असे प्रतिपादन गोरेगावचे तहसील तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले. सहयोग शिक्षक मंचच्यावतीने गोरेगावच्या शहीद जान्या-तिम्या विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव व निबंध, वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.पी. शेख होते. अतिथी म्हणून गोरेगावचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, सहयोगचे प्रवर्तक आर.आर. अगडे, गटसमन्वयक एस.बी. खोब्रागडे, केंद्रप्रमुख एल.एफ.गिरेपुंजे, उपस्थित होते. यावेळी ठाणेदार कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कारक्षम घडविण्याचे आवाहन केले. मागील तीन वर्षांपासून सहयोग शिक्षक मंचतर्फे जिल्हास्तरीय उपक्रमशील पुरस्कार दिले जातात. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नैतिक जिम्मेदारी समजून उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित केले जाते. यामध्ये शाळेची गुणवत्ता व दर्जा, सामाजिक कार्य, यशस्वी विद्यार्थी, श्रमदान अशा निकषावर आधारीत प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड केली जाते. उपक्रमशील पुरस्कार २०१७ साठी यावर्षी डी.टी. कावळे आमगाव, पी.एस. विश्वकर्मा सालेकसा, एम.के. सयाम देवरी, डी.व्ही. टेटे गोरेगाव, विश्वजित मंडल अर्जुनी-मोरगाव, भाष्कर नागपुरे सडक-अर्जुनी, नरेंद्र गौतम तिरोडा, नितू डहाट गोंदिया या आठ जणांची निवड करण्यात आली. सर्वांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, ‘प्राथमिक शिक्षक कसा असावा’ पुस्तक, पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष प्रमोदकुमार बघेले यांनी मांडले. मनोगत प्रवर्तक अगडे यांनी व्यक्त केले. संचालन युवराज बडे, श्रीकांत कामडी यांनी केले. आभार सुंदर साबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी हेमराज शहारे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साकुरे, सचिव अशोक चेपटे, अरविंद कोटरंगे, शिवाजीराव बडे, सच्चिदानंद जिभकाटे, जि.पी. बिसेन, अनिल मेश्राम, विजेंद्र केवट, ताना डावकरे, किशोर गर्जे, मुकेशकुमार अडेल, विष्णु राऊत, जगदीश पडोळे, देवेंद्र धपाडे, वाय.बी. पटले, राहुल कळंबे, के.आर. भोयर, अर्चना चव्हाण यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)