शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महागडे बियाणे कशाला? घरातील सोयाबीन करेल तुम्हाला मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, सध्या उन्हाळवाहीची कामे पूर्ण केली जात आहेत. खरीप हंगामात ४ लाख ३७ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होणार असून, सोयाबीनसाठी एक लाख ४२ हजार क्विंटल तर इतर पिकासाठी ९ हजार ८५१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.मोठ्या प्रमाणात बियाण्यांची गरज भासणार असली तरी यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात तब्बल ७०३.४ हेक्टर जमिनीवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली होती, तर सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दरवाढीमुळे बियाण्यांच्या किमतीवरही त्याचा परिणाम पडल्याचे काही कृषी व्यावसायिक सांगतात. त्यामुळेच वाढत्या महागाईत महागडे बियाणे घेण्यापेक्षा घरातील सोयाबीन शेतकऱ्यांना मालामाल करण्याची शक्यता असून, शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचेच बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७०३.४ हेक्टरवर उन्हाळी पेरासिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी सोयाबीन लागवडीला पसंती दर्शविली. ७०३.४ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला असून, सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकरी गती देत आहेत.

९० हजार मेट्रिक टन खताची लागणार गरजजिल्ह्याला ९० हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, मागणी प्रमाणे बियाणे व खते उपलब्ध होणार आहे. खतांचा ४ हजार ६७० मेट्रिक टन इतका बफर स्टॉक करण्यात आला आहे. शिवाय खरीप हंगामात बांधावर खते व बियाणे या योजनेंतर्गत ४ हजार ३०० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

घरच्या घरी करा बीज प्रक्रियाशेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने मागील वर्षी तसेच यंदाही जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अवघ्या काही तासांच्या प्रशिक्षणाअंति शेतकऱ्यांना घरच्या घरीच बीज प्रक्रिया करून बियाण्याची गुणवत्ता तपासता येते. त्यामुळे  फसवणूक टळते.

१ हजार १७० कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मागेल त्याला पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष रणनिती तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गौडबंगाल करणाऱ्यांवर होणार कारवाई

खरीप हंगामात बोगस बियाणे विकल्या जाण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या वतीने विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हास्तरीय एक तर तालुका स्तरावर प्रत्येकी एक पथकाचा समावेश आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी शेतीवरील उत्पादन खर्च करू करण्याच्या उद्देशाने घरातीलच सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करावा. गुणवत्ता तपासण्यासाठी सुरुवातीला बीज प्रक्रिया करावी. जिल्ह्यात बियाणे व खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी