शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे का बंद आहेत, याबाबतची विचारणा प्रवाशांकडून केली जात असून त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. पॅसेंजर गाड्या सुरु न झाल्याने अनेक प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच- वर्धा रेल्वे स्थानकावरुन नागपूर- अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा - भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु होत्या. तर सेवाग्राम रेल्वेस्थानकावरुन काजीपेठ ते बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु होती.मात्र, कोरोनामुळे यासर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्सnसध्या वर्धा रेल्वेस्थानकाहून ३२ रेल्वेगाड्यांची धडधड सुरु आहे. यामध्ये प्रतिदिन धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई - गांदिया स्पेशल, अहमदाबाद - चेन्नई स्पेशल, मुंबई - हावडा स्पेशल, कोल्हापूर - गाेंदिया स्पेशल, अहमदाबाद - हावडा स्पेशल, पुणे- हावडा स्पेशल, मुंबई - नागपूर स्पेशल या स्पेशल रेल्वे सध्या सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

रेल्वेचा प्रवास परवडेना !

कोरोनापूर्वी रेल्वेने नागपूर येथून अपडाऊन करायचो. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद झाल्याने मोठे हाल झाले. सध्या केवळ स्पेशल रेल्वेगाड्या धावत असून त्यातही आरक्षणाची अट असल्याने दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने खासगी वाहनाने किंवा एसटी महामंडळाच्या गाड्यांनी जाणे येणे करावे लागत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुुरु होईल, याकडे लक्ष लागले आहे.प्रणय राऊत, रेल्वे प्रवासी

पॅसेंजर बंद असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विना आरक्षण प्रवास करण्यास प्रतिबंध असल्याने अवघ्या कमी अंतरावर जाण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहे. आता तर हॉटेल्स, मॉल्स यांना देखील परवानगी मिळाली आहे. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने हाल होत आहे. रेल्वे विभागाने प्रवाशांच्या होणाऱ्या समस्येची दखल घेण्याची गरज आहे.प्रवीण खांडपासोळे, रेल्वे प्रवासी. 

 

टॅग्स :railwayरेल्वे