शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याचा विक्रम; शुक्रवारी मिळाला १४,४७० भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 05:00 IST

उपबाजारपेठेत पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. शुक्रवारी या बाजारपेठेत तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत रुईच्या दरात तेजी आल्याने त्याचा परिणाम भारतातील कापसाच्या भावावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. येत्या काळात कापसाच्या भावात आणखी तेजी आल्यास त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. 

प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्क सेलू : मागील दीड महिन्यांपासून १३ हजारांवर स्थिरावलेल्या कापसाने आज चांगलीच उसळी घेतली. सिंदी रेल्वे बाजार समितीची उपबाजारपेठ असलेल्या सेलूत शुक्रवारी तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाली असून, आज कापसाला विक्रमी म्हणजे ९ हजार ७०० ते १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.वर्धा शहरापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असलेले सेलू हे तालुक्याचे स्थळ आहे. येथे सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ असून, तेथे शेतकरी त्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणतात. कापसाचा हंगाम संपत असतानाच शुक्रवारी या उपबाजारपेठेत पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला १४ हजार ४७० रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. शुक्रवारी या बाजारपेठेत तब्बल ४०० क्विंटल कापसाची आवक झाल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत रुईच्या दरात तेजी आल्याने त्याचा परिणाम भारतातील कापसाच्या भावावर झाल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. येत्या काळात कापसाच्या भावात आणखी तेजी आल्यास त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. 

३.३० लाख क्विंटल कापसाची झाली खरेदी-    १ एप्रिल २०२१ ते १२ मे २०२२ या कालावधीत सेलू उपबाजारपेठेत एकूण तीन लाख ३० हजार ९५२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या कापसाची एकूण किंमत २६१,२३,२२,९२० रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले.

मुख्य बाजारपेठ सिंदी तरी मोठी उलाढाल सेलूतच-    सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची सेलू ही उपबाजारपेठ आहे. याठिकाणी कापूस तसेच इतर धान्याची मोठी आवक असते. मुख्य बाजारपेठ सिंदी असली तरी सेलू या उपबाजारपेठेत सिंदीच्या तुलनेत अधिक उलाढाल होत असल्याचे वास्तव आहे.

भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच?-    यंदा दिवाळी तोंडावर असताना कापसाला ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला. नंतर कापसाच्या भावात वेळोवेळी तेजी आल्याने प्रति क्विंटल कापूस १३ हजारांपर्यंत पोहोचला. तर शुक्रवारी सेलू उपबाजारपेठेत कापसाच्या भावाने नवा विक्रमच नोंदवला आहे. सध्या नाममात्र शेतकऱ्यांकडे कापूस असून, या भाववाढीचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांनाच होणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड