शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढीच्या अपेक्षेनं पांढरं सोनं घरातच ‘लॉक’; दहा हजारांचा भाव मिळण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:31 IST

आवक मंदावली; दहा हजारांचा भाव मिळण्याची आशा

वर्धा : अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीनपाठोपाठ कपाशीचे उत्पन्न घटल्याने बाजारपेठेत सध्या कपाशीला समाधानकारक भाव मिळत आहे. सध्या साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हा भाव दहा हजार रुपयांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कापूसविक्रीला ‘ब्रेक’ लावल्याने बाजारपेठेतील आवकही मंदावली आहे.

बोंडअळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे उत्पादनही निम्म्यावरच आले. सध्या एकरी चार ते पाच क्विंटलचा उतारा असून दोनच वेच्यांत कापसाची उलंगवाडी झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना होती; परंतु  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कपाशीला चांगली मागणी असल्याने राज्यातही कपाशीचे भाव सध्या ८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीचा सण आणि रब्बीच्या तयारीकरिता लागणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कापूस विकला. आता मात्र शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच साठवून ठेवला आहे. 

रब्बीच्या तयारीला वेग

खरीप हंगामात शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न झाल्याने त्यातून खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे दोन वेच्यांत कापसाची उलंगवाडी होताच ट्रॅक्टर फिरवून रब्बीची तयारी सुरू केली आहे. शेतातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली, तर काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही आटोपल्या आहेत.