शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन चालान काय कामाचे ?, 90 लाखांपैकी 38 लाख अजूनही ‘अनपेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

 वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत रस्ते म्हणावे तितके चांगले आणि सुरक्षित राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलीस वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्नशील असतात. हेल्मेट वापरणे, स्पीड लिमिट पाळणे, रॉंगसाईड वाहन न चालविणे, अशा प्रकारच्या सूचना वारंवार आणि सातत्याने दिल्या जातात. तरीही काही वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.  अशा वाहनांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात.

ठळक मुद्दे वाहतूक पोलीस सज्ज : वर्षभरात १२ हजारावर वाहनचालकांनी मोडले वाहतुकीचे नियम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चालान दिले जाते. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १२ हजार ४१४ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांना ९० लाख ३ हजार ५५० रुपयांच्या दंडाचे ऑनलाईन चालान पाठविले. परंतु, त्यापैकी तब्बल ३८ लाख ५९ हजार ७०० रुपये दंड अजूनही अनपेड असून ५१ लाख ४३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.  वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत रस्ते म्हणावे तितके चांगले आणि सुरक्षित राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलीस वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्नशील असतात. हेल्मेट वापरणे, स्पीड लिमिट पाळणे, रॉंगसाईड वाहन न चालविणे, अशा प्रकारच्या सूचना वारंवार आणि सातत्याने दिल्या जातात. तरीही काही वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.  अशा वाहनांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. अनेकांकडे पोलिसांना देण्यासाठी दंडाची रक्कमही नसते. तेव्हा पोलीस चालान मशीनमध्ये फोटो काढून दंडाची रक्क्म पेड आहे की अनपेड याची नोंद करतात. शहर वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत १२ हजारावर वाहनचालकांवर कारवाई करुन ९० लाख तीन हजार ५५० रुपयांचे ऑनलाईन चालान दिले.  सध्या शहरात सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई सत्र सुरु आहे. वाहतूक पोलीस शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सज्ज आहे.

२१ हजार चालकांनी भरला ऑनलाईन दंड वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना ईचालान देण्यात आली. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत २१ हजार ८८९ नागरिकांनी ५१ लाख ४३ हजार ८५० रुपयांचा दंड वाहतूक विभागाकडे ईचालानद्वारे जमा केल्याची माहिती आहे.शहरातील बजाज चाैक, आर्वीनाका परिसर, बॅचलर रोड परिसर आदी अनेक चाैकांमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसतात. त्यातही काही बेफाम वाहनचालक पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसतात. त्यामुळे अशांवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होते आहे. 

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस