शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

वर्धा पोलिस दलात बदल्यांची लाट : १९४ सर्वसाधारण बदल्या मंजूर, निम्म्याहून अधिक विनंत्या अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:39 IST

शिपायांसह अधिकारीही बदलले : २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यानी केला होता विनंती अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात पोलिस विभागात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायांपासून तर सहायक पोलिस उपनिरीक्षकांपर्यंतची सर्वसाधारण आणि विनंती बदली प्रक्रिया पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी घेतलेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेमध्ये शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांपर्यंत तब्बल १९४ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. तर तब्बल २४२ कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीकरिता अर्ज दाखल केले होते; परंतु त्यांची कारणे आणि इतर सर्व बाबींची चौकशी करून निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची विनंती अमान्य करण्यात आली.

तीन दिवसांच्या आत कार्यमुक्त करासर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पोलिस ठाण्यातून किंवा शाखेतून नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तीन दिवसांच्या आत कार्यमुक्त करावे. त्याचा अहवाल कार्यालयास तत्काळ सादर करावा. तसेच पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी / शाखा प्रमुख यांनी बदली झालेल्या पोलिस अंमलदार यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी त्यांच्याकडील गुन्हे तपास, अर्ज चौकशी, अकस्मात मृत्यू चौकशी, तसेच इतर प्रलंबित प्रकरणे व अन्य चार्ज उर्वरित पोलिस अंमलदाराकडे तत्काळ हस्तांतरित करून कार्यमुक्त करावे. जर कोणी अंमलदार उपलब्ध नसल्यास अन्य प्रभारी अधिकारी यांनी स्वतःचे ताब्यात घ्यावीत, तसेच यासंबंधिचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा, असे निर्देश पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिलेत.

असा आहे पोलिसांच्या बदल्यांचा तपशीलपद                                 सर्वसाधारण                            विनंती                                                                    मान्य                      अमान्यसहा. उपनिरीक्षक               २९                          १०                           १८पोलिस हवालदार                ४९                          ३०                           ५१पोलिस नाईक                    २५                           १०                            १८पोलिस शिपाई                    ९१                           ४०                           ७२ 

टॅग्स :wardha-acवर्धाGovernmentसरकार