लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर मार्गावरील नालवाडी परिसरात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रूंदीकरणाच्या खोदकामात शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. हा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास घडला. यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.शहरासह जिल्ह्यात रस्ता रूंदीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम जोरात सुरू आहे. डांबरी रस्ते फोडून सिमेंटचे रस्ते करण्याचा सपाटा सुरू आहे. नालवाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील रस्त्याचे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे. नालीचे खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईनला मोठे भगदाड पडल्याने पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. पाण्याचा जास्त दबाव निर्माण झाल्याने पाणी वेगाने बाहेर निघून त्याचे कारंजे, तयार झाले होते. सुमारे ७० फुटांपर्यंत हे कारंजे जात असल्याने येथून जाणारे वाहनचालक हे दृश्य पाहत पाहून आश्चर्य व्यक्त करीत होते. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृष्य टिपले. मात्र, यात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. तीन तासांपेक्षा जास्त वेळ या पाईपमधून पाणी वाया जात राहिले. तात्पुरता उपाय म्हणून जेसीबीचालकाने जेसबीचा पंजा फुटलेल्या पाईपच्या जागेवर ठेवण्यात आला. त्यानंतर काही वेळ हे उडणारे कारंजे बंद झाले. मात्र पाणी वाहने चालू होते. रस्ता खोदकामामुळे अनेकांना याचा नाहक त्रास होत असून सदर काम तत्काळ करण्याची मागणी होत आहे.
महामार्गाच्या खोदकामात जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST
शहरासह जिल्ह्यात रस्ता रूंदीकरणासाठी रस्त्याचे खोदकाम जोरात सुरू आहे. डांबरी रस्ते फोडून सिमेंटचे रस्ते करण्याचा सपाटा सुरू आहे. नालवाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील रस्त्याचे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे. नालीचे खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईनला मोठे भगदाड पडल्याने पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
महामार्गाच्या खोदकामात जलवाहिनी फुटली
ठळक मुद्देनालवाडी येथील प्रकार : लाखो लिटर पाण्याचा अपव्यय