शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

पाणीपुरवठा होणार ठप्प? ; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आलेय आर्थिक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:31 IST

Wardha : नागरिकांनी थकविली जवळपास २९ कोटींची पाणीपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावांसह इतर १३ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचे काम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केले जात आहे. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे.

या योजनेला आता दोन दशकाचा कालावधी झाला असून, ही योजना पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. परंतु, या कालावधीत ग्राहकांनी तब्बल २९ कोटींचा पाणीकर थकविल्याने ही योजना आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे या १४ ही गावांतील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), साटोडा, आलोडी, दत्तपूर, नालवाडी, म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी) व या गावांना पिपरी (मेघे) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे केला जातो.

सद्यःस्थितीत या सर्व गावांमध्ये जवळपास २५ हजार नळजोडण्या असून, त्याद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जातो. परंतु, बहुतांश ग्राहकांनी अनेक वर्षापासून पाणीपट्टीच भरलेली नाही. परिणामी २९ कोटींचा कर थकला आहे. वारंवार सूचना देऊनही ग्राहकांकडून पाणीपट्टी भरली जात नसल्याने योजना चालवायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१४ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबूनवर्धा शहरालगतच्या १४ मोठ्या गावांना जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केला जातो. पण, त्यांनी पाणीपट्टी थकविल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.

ऑनलाइन पाणीपट्टी भरण्याचीही सुविधापिपरी (मेघे) व सावंगी (मेघे) यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात येऊन पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेव्हा ग्राहक नियमित भरणा करीत होते. परंतु, काही दिवसांपासून नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे प्राधिकरणकडून ग्राहकांना पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. देयकावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही किंवा आरटीजीएसच्या माध्यमातूनही रक्कम अदा करू शकतो.

जलजीवन मिशनने अडचणीत भरजिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून हर घर नल से जल देण्याचे काम सुरू आहे. परंतु, रामभरोसे कामकाज असल्याने अनेक गावांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली; परंतु एक ते दीड वर्षापासून नळजोडणीच झाली नाही. असाच काहीसा प्रकार शहरालगतच्या १४ गावांत असून, बहुतांश नळजोडण्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला नोंदच नाही. परिणामी आधीच अडचणीत असलेल्या प्राधिकरणाला आणखी अडचणीत टाकले आहे. सध्या जलजीवन मिशन अंतर्गतही साडेपाच कोटींची जिल्हा परिषदेकडे थकबाकी आहे.

कुठे किती नळजोडण्या, किती थकबाकीगाव                      नळजोडणी                   थकबाकीपिपरी (मेघे)              ५४१६                       ४,९९,१७,३८९सिंदी (मेघे)                ३२२०                        ३,३५,५०,२५६बोरगाव (मेघे)            २४७०                       ३,७९,३७,३४७सावंगी (मेघे)              १६७०                       २,४६,८३,४८४साटोडा                    १४०७                        १,६३,४९,५३८आलोडी                    ५१३                          २५,२३,१४०म्हसाळा                    १४६९                        ६७,१९,१०२चितोडा                       ३२                          १,३९,७४१वरुड                         ६११                          ३८,३६,८१२नालवाडी                   २२३३                        १,९३,४७,८६१उमरी (मेघे)                 २३२                         २,१६,८७९वायंगाव (निपाणी)        १०१२                        ६,५२,४९,११५सेलू (काटे)                  ०३                           १,०३,४६३

"ग्राहकांकडे जवळपास २९ कोटींची थकबाकी आहे. वसुलीकरिता भरारी पथक तयार केले आहे. पथकाने दोन महिन्यांत १७ लाख वसूल केले असून, मार्चअखेरपर्यंत पाच कोटीचे उद्दिष्ट आहेत. नागरिकांकडून कराचा नियमित भरणा होणे अपेक्षित आहे, अन्यथा नळ जोडण्या तोडण्याचीही कार्यवाही करावी लागेल." - दीपक धोटे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा