शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिळ्या अन्नविसर्जनामुळे बोर नदीपात्रात जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचाही बोध घ्यायला तयार नाहीत. येथील नदीच्या जुन्या पुलावर वाहन उभे करून दिवसाढवळ्या शिळे अन्न नदीपात्रात विसर्जित केले जात आहे.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष : कार्यकर्त्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील बोर नदीपात्रात शिळ्या अन्नाचे विसर्जन केले जात असल्याने नदीकाठावरील जलस्रोत प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. या प्रकाराकडे प्रदूषण नियामक मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सेलू येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचाही बोध घ्यायला तयार नाहीत. येथील नदीच्या जुन्या पुलावर वाहन उभे करून दिवसाढवळ्या शिळे अन्न नदीपात्रात विसर्जित केले जात आहे. नदीपात्रातील त्या अन्नाच्या कुजण्यामुळे नदीकाठावरील जलस्त्रोतांना जलप्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय नदीपात्रातील जलचर जिवांना सुद्धा जिवाणूमुळे बाधा होऊ शकते. शहरात अनेक मंगल कार्यालयांजवळ अशाप्रकारे शिल्लक व शिळे अन्न टाकल्या जाते. त्यावर डुक्कर येथेच्छ ताव मारतात नंतर होणाऱ्या दुगरंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. याकरिता संबंधितानी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु आता तर शिळ्या अन्नाच्या विसर्जनाकरिता लोकांनी थेट नदीपात्राचाच आधार घेणे सुरू केले आहे.उद्देश जरी चांगला असला तरी जलप्रदूषणाचा धोका लक्षात घेता सदर प्रकार उचित नाही. यामुळे नदीकाठावरील पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जिवामुमुळे जलचर प्राण्यांना देखील यापासून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :pollutionप्रदूषण