शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

‘जल, जंगल, जमीन वाचवा’ सायकल अभियान

By admin | Updated: October 7, 2016 02:20 IST

वनसप्ताहानिमित्त जल, जमीन, जंगल वाचवा जनजागृती सायकल अभियानाचे आयोजन एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील

१५५ किमी मीटर अंतर : ६० रोव्हर रेंजर व एन.सी.सीचे छात्र सैनिक सहभागीवर्धा : वनसप्ताहानिमित्त जल, जमीन, जंगल वाचवा जनजागृती सायकल अभियानाचे आयोजन एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना युनिट, रोव्हर रेंजर युनिट व बहार नेचर फाऊंडेशन यांच्या विद्यमाने करण्यात आले होते. सदर सायकल अभियानाचे उद्घाटन एस.एस.एन.जे. महाविद्यालयाच्या परिसरातून खासदर रामदास तडस व प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय यांनी स्वत: काही दूर सायकल चालवून केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.दोन दिवसीय सायकल भ्रमंतीचे नेतृत्व रोव्हर लिडर तथा एन.सी.सी. अधिकारी मोहन गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, बहार नेचरचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, प्रा. संतोष मोहदरे व वन्यजीव अभ्यासक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. यात ६० रोव्हर रेंजर व एनसीसीचे छात्र सैनिक सहभागी झाले होते. सायकल भ्रमंती दरम्यान सालोड, वर्धा, सेवाग्राम, पवनार, सेलू, हिंगणी व बोरधरण येथे पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी बोरधरण, सालई, आमगाव, रिधोरा डॅम, जामणी, येळाकेळी, पिपरी, सालोड, सेलसुरा व देवळी असे १५५ कि़मी. अंतर पूर्ण करण्यात आले. सालोड येथे प्रहार इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, वर्धा येथे जिल्हा स्काऊटस् आणि कार्यालयाच्यावतीने जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, गाईड संघटक मंजुषा जाधव, सेवाग्राम येथे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, बोरधरण येथे बोरव्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लुचे, फाटे व जामणी येथे दिनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण जंगले, मुख्याध्यापिका चापडे यांच्या वतीने सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले. सदर अभियानांतर्गत सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरात छात्र सैनिकांनी वृक्षारोपण केले. बोर व्याघ्र प्रकल्प विभागातर्फे जंगल सफारी व बोरधरण परिसर भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. या शिवाय वन्यजीव व जैेवविविधता या विषयावर सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी फाटे यांनी, सापांचे संवर्धन व विषयावर संजय इंगळे तिगावकर यांनी तर पक्षी संवर्धन या विषयावर प्रा. किशोर वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. अभियान यशस्वी करण्यासाठी अश्विनी घोडखांदे, वैभव भोयर, रवी बकाले, आशिष परचाके, ठाकरे, उमा मसराम, कोमल गोमासे, राजकुमार भोवते, स्वप्नील शिंगाडे, राजू सुरकार, साकीब पठाण, मंगेश रौदळे, निहाल झाडे, गृहरक्षक अमोल तडस यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)