शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शेतात जमा होणारे पाणी पोहचले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:25 IST

दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती.

ठळक मुद्देशेतकºयांचे नुकसान टळले : जाण्यासाठी रस्ता झाला तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती. या पाण्यामुळे शेतजमीन खराबही होत होती. या त्रासातून शेतकºयाला कायम मुक्ती मिळाली आहे. वर्धा तालुक्याच्या महाकाळ व साटोडा या दोन गावातील २० शेतकºयांना सुक्ष्म पाणलोट विकास तत्वावर आधारित जलसंधारण प्रकल्पातून दिलासा मिळाला आहे.धाम नदीच्या काठावर असलेले साटोडा व महाकाळ हे दोन गावे या गावातील शेतकºयांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या संकटाला समोर जावे लागत होते. अनेक शेतकºयांच्या शेतात पावसाचे पाणी जमा होवून राहत होते. उतराच्या भागावर असलेली शेतजमीन यामुळे खराब होवून गेली होती. पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे मातीचे ही नुकसान शेतकºयाला झाले. या सर्व त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून साटोडा व महाकाळ ग्रामसभेने ठराव घेवून गावाजवळून जाणाºया नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण याचे काम हाती घेण्याचे ठरविले. या कामासाठी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धाचे मिलिंद भगत यांनी पुढाकार घेतला. या कामाला स्थापत्य अभियंता माधवराव कोटस्थाने यांचे मार्गदर्शन लाभले व कामाला सुरूवात झाली. या परिसरातल्या २० शेतकºयांच्या शेतात नाल्यालगत प्रत्येकी दोन पाईप टाकून शेताच्या उतारावर जमा होणारे पाणी नाल्यात सोडण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या नाल्यावर गॅबीआॅन बंधारा बांधताना शेतकºयांचा रहदारीचा रस्ता बंद होणार नाही याची काळजी घेत दोन ठिकाणी बांध व ओलांडणीचा पुल तयार करून देण्यात आला. त्यामुळे नाला खोलीकरण होवून शेतातील पाणी ही नाल्यात जमा होवू लागले. जलस्त्रोताची पातळी उंचावण्यास मदत झाली.राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे केली जात आहे. यात नाल्यांचे मुख्य प्रवाह, वळण बदलवून टाकण्यात आले आहे. मात्र साटोडा व महाकाळ येथे उत्तम दर्जाचे कामे झाले आहेत. हे काम राज्याच्या इतर भागासाठी आदर्श ठरणारे आहेत.- रवींद्र काळी, ज्येष्ठ भूवैज्ञानिक तथा प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शक.नाला खोलीकरण कामामुळे आम्हा शेतकºयांना चांगला फायदा झाला आहे. नाल्याला लागून शेत आहे. नाल्याचे पाणी शेतात न येता ते बंधाºयातच जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाणी उपलब्धता वाढली. आता चांगले उत्पन्न होण्यास मदत होणार आहे.- आकाश भगत, शेतकरी, साटोडा.