शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

पांढरकवडा बेड्यावर ‘वॉश आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी सावंगी पोलिसांनी केली.पांढरकवडा पारधी बेड्यावर गावठी मोह दारू गाळून ...

ठळक मुद्देचार दारूविक्रेते जेरबंद : गावठी दारूसह २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी सावंगी पोलिसांनी केली.पांढरकवडा पारधी बेड्यावर गावठी मोह दारू गाळून त्याची विक्री वर्धा शहर परिसरातील अनेक गावांमध्ये केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनुसार, सावंगी पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्त्वात पांढरवडा पारधी बेड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दारूविक्रेत्यांकडून जमिनीत लपवून ठेवलेला कच्चा मोहरसायन सडवा शोधून तो नष्ट केला. शिवाय काही ठिकाणी दारू गाळण्याचे साहित्य आढळून आल्याने व गावठी मोहाची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली आहे.सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूविक्रेता रमेश चिमणे, शिंडू भोसले, शरद ठाकरे, इंद्रपाल भोसले याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी केली.आॅटोसह ३.६७ लाख रूपयांचा दारूसाठा पकडलासमुद्रपुर- येथील हिंगणघाट-उमरेड मार्गावर पोलिसांनी सापळा रचुन अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या आॅटोला अडवून वाहनातील विदेशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी आॅटोसह ३ लाख ६७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय दारूची वाहतूक करणाºया तिघांना अटक करण्यात आली.बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणाºया एम.एच.३१ टी.सी. १०८ या आॅटोची पोलिसांनी वाहन अडवून पाहणी केली. पाहणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तो पोलिसांनी जप्त केला आहे. आॅटोतून पोलिसांनी विदेशी दारू किंमत ५७ हजार ६०० रुपये तसेच ३३ हजार ६०० रुपये किंमतीची बियर तसेच आणखी काही दारूसाठा असा एकूण ३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात दारूची वाहतूक करणाºया शेख शाहिद शेख खालिद (२८) रा. नागपूर, निलेश हरिचंद्र निकोडे (२९), इम्रान अमान उल्हास खान पठाण (२९) रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात समुद्रपुरचे ठाणेदार प्रविण मुंडे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, सचिन रोकडे, राजू जयसिंगपुरे, चरडे, कृष्णा इंगोले यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस