शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

कोरोनाला न घाबरता वर्धेकरांनी बालकांचे केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 5:00 AM

उल्लेखनीय म्हणजे, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढे आली असून, तशी नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी होताच गरोदर महिलेला ‘टीडी’च्या लसीची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर, एक महिन्यांच्या अंतराने  ‘टीडी’च्या लसीची दुसरी मात्रा दिली जाते. तर नवजात बालकाला २४ तासांच्या आत शून्य एचबी, ओपीव्ही, बीसीजीची लस दिली जाते.

ठळक मुद्देमुलींचा जन्मदर वाढला : शासकीय रुग्णालयांत नॉर्मल प्रसूतीवर दिला जातोय भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १० मे रोजी वर्ध्यात कोविडचा पहिला रुग्ण सापडला असला, तरी मार्च महिन्यात कोरोना आजाराची दहशत प्रचंड होती. इतकेच नव्हे, तर नेहमी वर्दळ राहणारे रस्ते निर्मनुष्य होती. असे असले, तरी जिल्हा सामान्य याच संकट काळात ८९३ प्रसूती झाल्यात. कोरोनायनात वर्ध्याकर इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून नवजात बालकांना वेळोवेळी लसीकरण करून घेतल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असून, शासकीय रुग्णालयांत नॉर्मल प्रसूतीवर भर दिला जात आहे.प्राप्त माहितीनुसार २०१५-१६ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९४७ होता, तर सन २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे तो ९७९ झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढे आली असून, तशी नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी होताच गरोदर महिलेला ‘टीडी’च्या लसीची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर, एक महिन्यांच्या अंतराने  ‘टीडी’च्या लसीची दुसरी मात्रा दिली जाते. तर नवजात बालकाला २४ तासांच्या आत शून्य एचबी, ओपीव्ही, बीसीजीची लस दिली जाते. बालक दीड महिन्यांचा झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस, आयटीव्ही लसीची पहिली मात्रा दिली जाते. अडीच महिन्यांनंतर बालकास पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस लसीची दुसरी मात्रा दिली जाते, तर बालक साडेतीन महिन्यांचे झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरसची तिसरी मात्रा दिली जाते. बालक नऊ महिन्यांचे झाल्यावर एमआर आणि व्हिटॅमिनची लस दिली जाते. या लसी बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने, वर्ध्याकरांनीही कोरोना संकटाच्या काळात मनात कुठलीही भीती न बाळगता  आणि न चुकता आपल्या बालकांना लसी दिल्या आहेत.राज्यात पहिल्या पाचमध्ये वर्ध्याचा समावेशकोरोनाची लस आली असली, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. असे असले, तरी कोविड संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी सातत्याने कार्यरत राहून सेवा देत आहेत. कोरोना काळात बालकांना लस देण्याच्या मोहिमेत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यात लसीकरणाचे आकडे वेगवेगळे असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी सांगितले.

बालकाच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या लहान मुलांना न चुकता नियोजित वेळी लसीकरण केले पाहिजे. शासकीय रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. - डॉ.प्रभाकर नाईक, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या