शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश तर आला; पण रक्कम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:47 IST

कर्जमाफी झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला. मात्र बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात रक्कमच जमा नसल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची थट्टा कायमबँकांकडून मार्गदर्शन करण्यास टाळाटाळ

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आली तेव्हापासून सुरू झालेला गोंधळ आजही कायम आहे. कर्जमाफी झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला. मात्र बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात रक्कमच जमा नसल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील शेतकरी अनिल लक्ष्मणराव चरडे यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला; परंतु मोबाईलवर कर्जमाफीचा संदेश आल्यानंतर त्यांनी लगेच कर्जाची उचल केलेल्या वायफड येथील बँक आॅफ बडोदाची शाखा गाठून चौकशी केली. मात्र तिथे त्यांच्या खात्यात कुठलीच रक्कम जमा झाली नसल्याचे कळले. त्यांनी विचारणा केली असता प्रतीक्षा करा असे उत्तर मिळाले. याला दोन महिने होत आहेत.चरडे यांनी १९ मे २०१६ रोजी ९० हजार रुपयांचे कर्ज उचलले होते. या कर्जावर व्याज चढून ते ९३ हजार रुपये झाले. कर्जमाफी योजनेची घोषणा होताच निर्देशानुसार अर्ज भरला. त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्रुटी असलेल्या यादीत आपले नावही तपासले असता त्यात नाव नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना कर्जमाफी झाल्याचा संदेश आल्याने आपला सातबारा कोरा झाल्याचे स्वप्न रंगविणाऱ्या या शेतकऱ्यांवर बँकांचे आणि प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.

मग, कर्जमाफीचा संदेश कसा?३१ मार्च २०१६ पर्यंतचेच कर्ज माफ करण्याचे आदेश बँकेला असताना १९ मे २०१६ रोजी कर्ज घेणाऱ्या या शेतकऱ्याला कर्जमाफी झाल्याचा संदेश कसा, असा नवा प्रश्न समोर येत आहे. कर्जमाफी राबविणाऱ्या यंत्रणेची ही चूक असेल तर अशी चूक शेतकऱ्याच्या जीवावर उठणारी ठरू शकते, याची जाणीव या यंत्रणेला नाही का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

३१ मार्च २०१६ पर्यतचे कर्ज माफ करण्याचे आदेश बँकांना आले आहेत हे खरे आहे. पण यानंतर कर्ज उचललेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश कसा आला हा संशोधनाचा विषय आहे. या शेतकऱ्याने जिल्हा बँकेशी संपर्क साधावा.- वामन कोहाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.

असा प्रकार घडलेल्या शेतकऱ्याने आमच्याशी संपर्क साधावा. या संदर्भात काय गडबड झाली याची चौकशी करण्यात येईल. नियमानुसार संदेश आल्यानंतर ती रक्कम खात्यातून माफ होणे अनिवार्य आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी,वर्धा

टॅग्स :Farmerशेतकरी