शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची संततधार, नदी-नाले तुडुंब; नांद धरणाचे ७, तर लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2024 10:07 IST

हिंगणघाट तालुक्यातील मानोरा ते काजलसरा रोडवरील पुलाला खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली आहे.

वर्धा - पावसाने दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याला तडाखा दिला. शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरले आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नांद (ता. उमरेड, जि. नागपूर)  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सकाळी धरणात येणाऱ्या येव्यानुसार व आवश्यकतेप्रमाणे धरणाचे ७ दरवाजे ३५ से.मी.ने उघडुन धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी आपल्या स्वता:सह कुटूंबीयांची व इतर नागरीकांच्या जान, मालाची व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कुणीही नदी पात्र ओलांडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. ROS नुसार जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता  शनिवारी सकाळी ९:०० वाजता लाल नाला धरणाचे ५ दरवाजे ०५ से.मी.ने उघण्यात आले.  विसर्ग १२.१२ घनमीटर प्रती सेकंद सोडण्यात येत आहे. लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.  

शनिवारी सकाळी पोथरा धरण हे ८५ टक्के भरलेले आहे. ते आज १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. हिंगणघाट तालुक्यातील मानोरा ते काजलसरा रोडवरील पुलाला खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस