शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Wardha Lok Sabha Results 2024 : पाचव्या फेरीतही काळे यांची आघाडी कायम

By रवींद्र चांदेकर | Updated: June 4, 2024 14:06 IST

Wardha Lok Sabha Results 2024 : पाच फेऱ्यांअंती अमर काळेंना एकूण एक लाख आठ हजार ८२१ मते

Wardha Lok Sabha Results 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघात पाच फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे १२ हजार हजार ३३५ मतांनी आघाडीवर आहे. पाच फेऱ्यांअंती त्यांना एकूण एक लाख आठ हजार ८२१, तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना ९६ हजार हजार ४८६ मते मिळाली.

पहिल्या फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी १८ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत अमर काळे यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत काळे यांना १९ हजार ५६५, तर तडस यांना १९ हजार ५८३ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत काळे यांना २१ हजार ९९९, तर तडस यांना १६ हजार ७३१ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत काळे यांना २४ हजार ८२०, तर तडस यांना २१ हजार ३१ मते मिळाली आहे. चौथ्या फेरीत काळे यांना २० हजार ६०, तर तडस यांना १९ हजार ६८६ मिळाली आहे. पाचव्या फेरीत काळे यांना २२ हजार ३७७, तर तडस यांना १९ हजार ४५५ मते मिळाली. बसपाचे मोहन राईकवार यांना चार हजार ५०९, तर अपक्ष आसीफ यांना तीन हजार ७१७ मते मिळाली.

वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून या सहाही मतदारसंघातून तब्बल २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये भाजपाचे रामदास तडस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. राजेंद्र सोळंखे, बहुजन समाज पार्टीचे डॉ. मोहन राईकवार यांच्यासह १३ पक्षाचे तर ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ही निवडणूक भाजपा विरुद्ध शरद पवार गट यांच्यातच राहिली. २६ एप्रिलला मतदानात ६४.८५ टक्क्यांचा टप्पा गाठला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३.६७ धामणगाव टक्क्यांनी मतदान वाढले आहे.                              

सन २०१९ च्या निवडणुकीतही भाजपाकडून खासदार रामदास तडस रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अॅड. चारुलता ठोकस यांनीही लोकसभेच्या मैदानात आपले भविष्य आजमावले होते. अॅड. चारुलता टोकस यांची मतदारसंघात असणारी अनुपस्थिती तसेच केंद्रातील भाजप सरकारची विकासकामे लक्षात घेऊन मतदारांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या बाजूने कौल दिला होता. रामदास तडस हे १ लाख ८९ हजार मतांनी विजयी झाले होते. रामदास तडस हे २०१४ पासून सलग दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असून आता पुन्हा तिसऱ्यांदा ते खासदारकीसाठी रिंगणात आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४wardha-acवर्धा