शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वर्धा दूरदर्शन केंद्राचे प्रक्षेपण जानेवारीअखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:33 PM

टेलीव्हिजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देराज्यातील २७६ केंद्रांवर गंडांतर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : टेलीव्हिजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे. तर राज्यातील २७६ केंद्रांवर गंडांतर येणार आहे. यामुळे कधी मालिकांची आठवडाभर वाट बघण्याची हुरहुर लावणारे दूरदर्शन आज पडद्याआड होणार आहे.२२ वर्षापूर्वी आर्वी शहरात सुरू झालेले दूरदर्शन केंद्र येत्या ३१ जानेवारीला बंद होणार आहे. याची माहिती होताच अनेकांकडून दूरदर्शनवरील अनेक मालिका आणि कार्यक्रमांना उजाळा देण्यात आला. टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन बंद होणार असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटला आहे. मनोरंजनाचे साधन असणारे दुरदर्शन केंद्र बंद करण्याचे आदेश मुंबईहून या तीनही केंद्रांवर धडकले आहेत.आर्वी शहरात न्यायालयाच्या समोरील नगर पालिकेच्या जागेवर इमारतीत २५ नोव्हेंबर १९९५ मध्ये तत्कालीन केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री माधवराव सिंधिया यांच्या हस्ते भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष वसंतराव साठे व खा. रामचंद्र घंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यलय सुरू झाले. यासह जिल्ह्यात दूरदर्शन केंद्रामुळे वर्धा आणि पुलगाव येथेही दूरदर्शनचे कार्यालय उघडण्यात आले. या दूरदर्शनवरून प्रकाशित होणारे कार्यक्रमा प्रारंभीच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शन करणारे ठरले.रामायण, महाभारत, हनुमान, मराठी रसिकांची फेम असलेले चालता बोलता व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, रंगोली, शैक्षणिक कार्यक्रम, बायोस्कोप अशी अनेक हिंदी, मराठी सिरीयलसह इतर कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत होते. शेतीकरिता असलेला आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम शेतकरी आवर्जून बघत होते. शिवाय मराठीचे बातमीपत्र बघणारे आजही आहेत. हेच दूरदर्शन केंद्र हे २२ वर्षानंतर बंद होणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब जनता पैसा खर्च करुन डिश टी.व्ही., केबल घरी घेऊ शकत नाही. या मोफत दुरदर्शन सेवेचा आनंद घेत आहेत. यामध्ये जवळपास आर्वी परिसरातील २०० गावातील २ लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांवर अन्याय केल्याच्या प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, पुलगाव ही सर्वच दूरदर्शन केंद्र ३१ जानेवारीला बंद होत असल्याने या येथील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दूरदर्शन केंद्र सुरू राहण्याकरिता जातीने प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरत आहे.

एफएमही होणार बंद वर्धा जिल्ह्यात केवळ टेलीव्हीजनची सेवा नाही तर त्यांच्यावतीने एफएमचीही सेवा पुरविण्यात येत होती. या निर्णयामुळे ही सेवाही बंद होणार आहे. यामुळे रात्री एफएमवर विविध कार्यक्रमाचा आनंद घेणाऱ्या वर्धेकर नागरिकांना या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.

डिजीटलायझेशनमध्ये वर्धेचा समावेश होणे अपेक्षितच्डिजीटलायझेशनच्या नावाखाली शासनाने दूरदर्शन केंद्र बंद करण्याचा घाट घातला आहे. वर्धेत बंद होत असलेल्या इतर नाही तर किमान जिल्हास्थळ असलेले केंद्र सुरू ठेवून येथे डिजीटलाईज सेवा देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. वर्धेतील सर्वच केंद्र बंद करण्यात येत असल्याने या भागातील नागरिकांना शासनाच्या या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

दुरदर्शनला आकाशवाणीचे स्वरुप द्या दूरदर्शन केंद्र बंद न करता आर्वीच्या केंद्रावरुन आकाशवाणीचे डिजिटलायझेशन केल्यास अनेक कार्यक्रमासह येथील जाहिराती ग्रामीण भागातील लोककला कार्यक्रम व समाज प्रबोधनपर कार्यक्रम या केंद्रावर प्रसारण होऊ शकते. त्यामुळे या केंद्राला आकाशवाणी केंद्राचे स्वरुपसोबतच आर्थिक सहकार्य मिळू शकते अशी मागणी जनतेची आहे.

गत २२ वर्षांपासून सुरू असलेले आर्वी येथील दूरदर्शन केंद्र सुरू रहाण्याकरिता लवकरच खासदारांसह सोबत केंद्रीय सुचना व प्रसारण मंत्र्यासोबत चर्चा करुन नियमित सुरू राहण्याकरिता प्रयत्न करेल.- दादाराव केचे, माजी आमदार

आर्वी येथील सुरू असलेले दूरदर्शन केंद्र कोणत्याही परिस्थितीत सुरू राहण्याकरिता मी खासदार रामदास तडस यांच्यासोबत चर्चा करुन प्रयत्न करेल.- अमर काळे, आमदार

टॅग्स :Governmentसरकार