शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकर निवडणार आपला शहरपक्षी; विदर्भात प्रथमच शहर पक्ष्यासाठी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 10:13 IST

विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ २३ जूनपासून होत आहे. बहार नेचर फाऊंडेशन व नगरपरिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बहार व वर्धा नगर परिषदेचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ २३ जूनपासून होत आहे. बहार नेचर फाऊंडेशन व नगरपरिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. रिंगणात पाच पक्षी उमेदवार असून निवडणूक मुख्यत्वे आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.वर्धा नगरीचा शहरपक्षी (सिटी बर्ड) निश्चित करण्यासाठी पाच पक्ष्यांमधून निवडून आलेल्या पक्ष्याला शहरपक्षी घोषित केले जाणार आहे. अशाप्रकारे पक्ष्यांची निवडणूक कोकणातील सावंतवाडी येथे प्रथम २०१७ मध्ये घेण्यात आली होती. वर्धा शहरपक्षी निवडणूक ही महाराष्ट्रातील दुसरी व विदर्भातील पहिली निवडणूक ठरणार आहे. वर्धा नगरवासियांना पक्षी जीवनाची ओळख व्हावी, शहराची पक्षीप्रेमी व पर्यावरणस्नेही ही ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित आहे.या निवडणुकीकरिता वर्धा शहर परिसरात आढळणारा तांबट, पांढऱ्या छातीचा धीवर, ठिपकेवाला पिंगळा, भारतीय निलपंख व कापशी घार असे पाच पक्षी उमेदवार ठरविले आहे. यातून आॅनलाईन पद्धतीने शहरपक्षी निवडायचा आहे. यासाठी एक गुगल लिंक उपलब्ध करून दिली जाईल. या लिंकवर क्लिक केल्यास पाच पक्षी उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका उपलब्ध होईल. शिवाय, शहरातील न.प. व बहार कार्यालय, ‘डिझायनो’ जेल रोड, महावीर उद्यान, बजाज वाचनालय येथे मतदान केंद्र (बुथ) राहील. छापील मतपत्रिकेद्वारे तेथे मतदान करता येईल. एका फिरत्या मतदान केंद्राचाही वापर करण्यात येणार आहे.निवडणूक कालावधी २३ जून ते १५ आॅगस्ट राहणार असून सर्व वयोगटातील शहर वासियांना मतदान करता येईल. ९ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. मतदान जागृतीकरिता तथा शाळा कॉलेजच्या युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी बहार नेचर फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून निसर्ग अभ्यासक डॉ. तारक काटे, डॉ. गोपाल पालीवाल व प्रा. अतुल शर्मा काम पाहणार आहेत. शहरातील नागरिकांनी या अनोख्या निवडणुकीत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन बहार नेचर फाउंडेशन तसेच नगर परिषदेद्वारे करण्यात आले आहे.

हे पक्षी आहेत उमेदवारतांबट - कॉपरस्मीथ बार्बेट, पांढऱ्या छातीचा धीवर - व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, ठिपकेवाला पिंगळा - स्पॉटेड आऊलेट,भारतीय नीलपंख - इंडियन रोलर, कापशी घार - ब्लॅकशोल्डर काईट

निवडणूक प्रक्रिया अशी आहेआॅनलाईन निवडणुकीकरिता वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्यावर क्लीक केल्यास मतपत्रिका उपलब्ध होईल. मतपत्रिकेवर पाच पक्षीउमेदवारांची मराठी व इंग्रजी नावे दिलेली आहे. पाचपैकी एकाच पक्ष्याला मतदान करता येईल. त्यानंतर मतदान करणाऱ्याने स्वत:चे नाव व गाव लिहावे आणि हा फार्म सबमिट करावा.विदर्भातील वर्धा शहरात पहिल्यांदा नागरी पक्षी ठरविण्याकरिता निवडणूक होत आहे, याचा आनंद आहे. मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मतदान केंद्र राहील. तसेच फिरते मतदान केंद्रही राहील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शहरपक्षी निवडावा. निवडलेला पक्षी चित्र व शिल्पाच्या रूपात वर्धानगरीत महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, नगर परिषद, वर्धा.

माणसांची जीवनशैली निसर्गापासून दूर जाणारी आहे. निसर्गाशी शत्रुत्व पत्करून नव्हे तर मैत्री करूनच मानवाला विकास साध्य करावा लागेल. वर्धा शहरपक्षी निवडणूक हे त्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे. विद्यार्थी, नागरिकांना निसर्ग वाचायला शिकविणे, निसर्गाशी मैत्री करावी ही जाणीव निर्माण करणे, ही ताकद या उपक्रमात आहे. आपण भरभरून मतदान करा. अवतीभोवतीचे पक्षी पहा. निसर्ग वाचा. या उपक्रमात सहभागी व्हा. निसर्गमित्र बना.- प्रा. किशोर वानखडे, अध्यक्ष, बहार नेचर फाऊंडेशन, वर्धा.

टॅग्स :wildlifeवन्यजीव