शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Wardha Blast; ‘त्या’ सहा कुटुंबांत उसळला आक्रोशाचा आगडोंब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:21 IST

पुलगावातील लष्करी तळाजवळच्या केळापूर, सोनेगाव या गावांसाठी मंगळवार २० नोव्हेंबरचा दिवस हा काळा दिवस म्हणूनच उजाडला होता.

ठळक मुद्देकुठल्याही सुरक्षेविना बॉम्ब हाताळले गेलेकेळापूरवर पसरले मृत्यूचे सावटगावकऱ्यांमध्ये ठेकेदाराप्रती तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पुलगावातील लष्करी तळाजवळच्या केळापूर, सोनेगाव या गावांसाठी मंगळवार २० नोव्हेंबरचा दिवस हा काळा दिवस म्हणूनच उजाडला होता. केळापुरातील चार तर सोनेगावमधील एक कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडले आहे. या पाच कुटुंबातील कर्ते पुरुष बॉम्बब्लास्टमध्ये ठार झाले आहेत.रोज कष्ट करून चार पैसे मिळवायचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करायचे असा साधासुधा पण कष्टाचा दिनक्रम असलेल्या या कुटुंबांचा आता जीवनक्रमच बदलून गेला आहे. घरातील स्त्रियांचा हंबरडा ऐकून गावकºयांच्या काळजाचे पाणी होत आहे. तर या पाच कुटुंबांतील लहानग्या मुलांच्या निरागसतेवर अकाली अनाथपणाचा टिळा लागला आहे.रोजंदारीच्या कामाला गेलेला घरचा कर्ता माणूस परत येत नाही आणि त्याचा छिन्नविच्छिन्न झालेला देहच परत येतो तेव्हा त्या कष्टकरी कुटुंबावर काय कोसळते हे तेच कुटुंब जाणू शकते, आपण फक्त त्याची कल्पनाच करू शकतो. यातील राहुल भोवते हा तरुण अवघ्या २३ वर्र्षांचा होता. आज संध्याकाळी या गावातून चार अंत्ययात्रा निघाल्या. तर सोनेगावातून एक. या घटनेने दोन्ही गावे सुन्न होऊन गेली आहेत.५० किलोची एक पेटीज्या पेट्यांमध्ये हे बॉम्ब ठेवले होते ती एक पेटी ५० किलोची होती. या पेटीला एक माणूस डोक्यावर वा हातात धरून सुमारे १५० मीटरचे अंतर चालून जात होता. तसे करताना कुठलीही सुरक्षा योजना तेथे नव्हती.ठेकेदाराप्रती धुमसतो आहे असंतोषज्या ठेकेदाराने या कामाचा ठेका घेतला होता त्याच्याप्रती गावकºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्याने योग्य ती खबरदारी घेतली नाही म्हणून हा अपघात घडला असा गावकºयांचा आरोप आहे. तसेच लष्करातले अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट