शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

वर्धा गर्भपात प्रकरण; वर्ध्याची आराेग्य यंत्रणाही गर्भपात रॅकेट चाैकशीच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 07:00 IST

Wardha News राज्यभरात खळबळ उडवून देणारे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरण केवळ वर्धा जिल्ह्यात पुरतेच मर्यादित नसून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणातील पापाचे वाटेकरी दुसऱ्या जिल्ह्यातही असल्याचे चिन्ह दिसत आहे.

ठळक मुद्देतपास यंत्रणांकडून पापाचे खोदकाम सुरूआरोपींची संख्या वाढण्याचे संकेत

नरेश डोंगरे /अभिनय खोपडे

 वर्धा : अवैध गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रेखा कदम आणि त्यांच्या साथीदारांच्या पापात आरोग्य यंत्रणेतील अनेक जणांचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. तपास यंत्रणेकडून त्या दिशेने पावल टाकली जात असल्याने या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे संकेत मिळाल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

राज्यभरात खळबळ उडवून देणारे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरण केवळ वर्धा जिल्ह्यात पुरतेच मर्यादित नसून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणातील पापाचे वाटेकरी दुसऱ्या जिल्ह्यातही असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी त्यांच्याकडे नजर वळवली आहे. दरम्यान, आज आर्वी शहरात ‘लोकमत’ने या प्रकरणाच्या संबंधाने अनेकांशी संपर्क केला असता वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित तसेच सामाजिक क्षेत्रातील काही मंडळींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. वैद्यकीय क्षेत्रात कट प्रॅक्टिसची जोरदार चलती आहे. संबंधित तज्ञज्ञाकडे किंवा ज्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या रुग्णांना पद्धतशीर हाताळले जाते, अशा डॉक्टरांकडे त्यांच्या संपर्कातील गावोगावची मंडळी तसे रुग्ण पाठवतात. डॉ. रेखा कदम यांच्या कुटुंबात त्यांचे पती, त्यांच्या स्त्री रोग तज्ञ सासू तसेच सासरे ही डॉक्टर आहेत, ते चौघे गेल्या ४० वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांची ठिकठिकाणच्या डॉक्टरांशी ओळख आहे आणि व्यावसायिक संबंधही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करणाऱ्यांची वर्दळच राहायची, असे समजते.

रुग्णांचा जीव वाचविण्याला डॉक्टर सर्वोच्च प्राधान्य देतात. मात्र पैशासाठी चटावलेल्या डॉ. रेखा कदम या आद्य कर्तव्याला हरताळ फासून रुग्णाचा जीव धोक्यात घालत होत्या, असे स्पष्ट झाले आहे. ज्या प्रकरणाने त्यांचे बिंग फोडले ती पीडित अवघी १३ वर्षाची असून तिची शरीरयष्टीही किरकोळ आहे. मात्र तिच्या शारीरिक अवस्थेकडे दुर्लक्ष करून डॉ. कदम यांनी तिचा गर्भपात करण्याचा निर्दयपणा दाखवला. या मुलीचा जीव जाऊ शकतो, याची स्पष्ट कल्पना असूनही डॉ कदम यांनी हे पातक केले. त्यावरून येथे गर्भपाताकडे टायफाईच्या उपचारासारखे बघितले जात होते, असे आता बोलले जात आहे.

कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यासाठी रीतसर न्यायालयातून परवानगी घ्यावी लागते. पोलीस आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनाही त्याची माहिती द्यावी लागते. कदम यांनी या सर्व कायदेशीर बाबी झुगारून लावल्या होत्या.

तपासात अनेक बाबी अधोरेखित

विशेष म्हणजे, कोणत्याही अधिकृत गर्भपात सेंटरला महिन्याला किती गर्भपात झाले, त्याची नोंद व्यवस्थित आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. मात्र ही जबाबदारी आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळली जात नव्हती, असाही आरोप आता होऊ लागला आहे. पोलिसांच्या तपासातही अशा अनेक बाबी अधोरेखित झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अनेक अधिकारी डॉ. कदम यांच्या पापात सहभागी असल्याचा संशय आहे. त्यानुषंगाने पोलिस तपास करीत असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक ‘नो रिप्लाय’

वर्धा जिल्ह्यातील वद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून या गर्भपाताच्या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे. त्यांनी कदम यांच्या अवैध गर्भपात केंद्राला मुक परवानगी दिली होती, अशीही जोरदार चर्चा आहे. या संबंधाने डॉ. तडस यांच्याशी ‘लोकमत’ने वारंवार संपर्क करून बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन ‘नो रिप्लाय’ होता.

माजी खासदाराची नातसून

सध्या पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. रेखा कदम यांचे सासरे व सासू हेही बाल रोग व स्त्री रोगतज्ञ आहेत. त्यांचे सासरे डॉक्टर कु. ज. कदम यांचे वडील नानाजी उर्फ जगजीवनराव कदम हे वर्धा लोकसभा क्षेत्राचे १९७१ मध्ये खासदार म्हणून देशातील क्रमांक दोनचे मताधिक्य घेऊन निवडून आले होते. त्यांनी उद्योगपती कमलनयन बजाज यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी ते १९४८, १९५२, १९६७ मध्ये आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. डॉक्टर कदम यांचा आर्वी येथे जुना वैद्यकीय व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचा मोठा गोतावळा होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी