शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा गर्भपात प्रकरण : आरोपी डॉ. नीरज कदम सेवेतून बडतर्फ, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 18:47 IST

डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचीन ओम्बसे यांनी काढले आहे.

ठळक मुद्देजि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे धडकले आदेशनीरज कदम यांची दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर कारागृहात रवानगी

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण देशाची झोप उडविली असतानाच याप्रकरणात अटक असलेल्या आरोपी डॉ. नीरज कुमारसिंग कदम याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी पदावरुन तत्काळ बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचीन ओम्बसे यांनी काढले आहे.

आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताच्या घटनेने सर्वांचीच झोप उडाली. मागील पाच दिवसांपासून पोलीस विभाग दिवसरात्र पुरावे गोळा करण्याचे काम करीत असतानाच आरोग्य विभागाने कदम रुग्णालयातील चारही डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी पुन्हा विविध कलमान्वये गुन्हाही दाखल केला.

अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी २०१८ पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होता. त्याला ५० हजार रुपये मानधनतत्वावर मिळत होते. मात्र, शासकीय औषधसाठा त्याच्या खासगी रुग्णालयात आढळून आल्याचा अहवाल टास्कफोर्स चमूने सादर केल्याने तसेच डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी तथ जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिले आहे. 

डॉ. नीरज कदमला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी आर्वी येथील गर्भपात प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. नीरज कदम याची पोलीस कोठडी मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.डॉ.नीरज कदम याला पॉक्सो कायद्यांतर्गत आर्वी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान मंगळवारी ता. १८ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपातhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPoliceपोलिस