शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाळूघाट लिलावाचा विषय पर्यावरण विभागाकडे ‘पेंडिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून वाळूघाट लिलावाबाबत काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्मण निर्गमित करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाच्या नियमावलीनूसार तालुकास्तरावरील तांत्रिक समितीद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण करून एकूण ३७ वाळूघाटांचा लिलाव करण्याच्या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

ठळक मुद्देशासनाचा बुडतोय महसूल : अडीच महिने लोटले तरी कार्यवाही शुन्यच

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळूघाट लिलावासाठी यंदाच्या वर्षीपासून नवीन धोरण अवलंबले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा खनिकर्म विभागाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करून एक प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पण त्याला अडीच महिन्यांचा कालावधी लोटूनही पर्यावरण विभागाकडून कुठलीही कायवाई करण्यात न आल्याने तसेच चोरी लपीने वाळूची चोरी होत असल्याने सध्या जिल्हा प्रशासनाचा मोठा महसूल बुडत आहे.प्राप्त माहितीनुसार, पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून वाळूघाट लिलावाबाबत काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्मण निर्गमित करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाच्या नियमावलीनूसार तालुकास्तरावरील तांत्रिक समितीद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण करून एकूण ३७ वाळूघाटांचा लिलाव करण्याच्या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने त्यांचा अहवाल १७ मार्च २०२० ला प्रसिद्ध केला. शिवाय खनिकर्म आराखडा तयार करून १० जून २०२० ला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीचे वृत्त आणि आवश्यक आवश्यक कागदपत्र जोडून सदर वाळूघाटांचा लिलाव करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पर्यावरण विभागाकडे ५ आणि ६ जुलैला प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सादर करून दोन महिने १४ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे. पर्यावरण विभागाने वर्धा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाचा विषय आपल्याकडे का पेंडींग ठेवला आहे हा सध्या संशोधनाचा विषय ठरत असल्याने या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पर्यावरणची हिरवी झेंडी मिळाल्यावर पुढील कार्यवाहीपर्यावरण विभागाकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर जिल्हा खनिकर्म विभागाला निविदा प्रक्रिया पूर्ण करून वाळूघाटांचा लिलाव करावा लागणार आहे. प्रत्यक्षात लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यावरच नेमका किती महसूल जिल्हा प्रशासनाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.विशेष म्हणजे पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत लिलाव प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.जनसुनावणीसह विविध प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पर्यावरण विभागाला ५ आणि ६ जुलै २०२० ला पाठविण्यात आले आहे. लवकरच त्यांच्याकडून परवानगी मिळेल. त्यांच्याकडून परवागी मिळाल्यावर निविदा प्रक्रिया करून वाळूघाटांचा प्रत्यक्ष लिलाव करण्यात येईल.- डॉ. इमरान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Thiefचोर