शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलेच्या अहवालाची आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

नागपूरच्या सतरंजीपुरा येथील एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून त्या महिलेला ताब्यात घेतले. लॉकडाऊनच्या काळात नियमाचा भंग केल्यामुळे महिलेसह तिला आसरा देणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसह रुग्णवाहिकेच्या चालकासह मालकाविरुद्ध शुक्रवारी वर्धा शहर पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतिघे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, नागपूरच्या सतरंजीपुऱ्यातून रुग्णवाहिकेने आली होती वर्ध्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील सतरंजीपुरा भागात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. परंतु, याच भागातील रहिवासी असलेली एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आली. ही बाब वर्धा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास येताच तिला व रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यानंतर दक्षता म्हणून एकूण तिघांना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर नागपूरवरून वर्धेत आलेल्या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी शुक्रवारी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे. त्याच्या अहवालाची वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा आहे.नागपूरच्या सतरंजीपुरा येथील एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून त्या महिलेला ताब्यात घेतले. लॉकडाऊनच्या काळात नियमाचा भंग केल्यामुळे महिलेसह तिला आसरा देणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसह रुग्णवाहिकेच्या चालकासह मालकाविरुद्ध शुक्रवारी वर्धा शहर पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी दक्षता म्हणून या महिलेसह तिच्या संपर्कात आलेल्या एकूण तिघांना आरोग्य विभागाच्या वतीने वर्धा शहरातील आयटीआय टेकडी भागातील कोविड सेंटर येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.या तिघांवर आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या या महिलेचा स्वॅब शुक्रवारीच तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी या महिलेचा तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल, असे सांगण्यात येत आहे. या महिलेचा अहवाल नेमका काय येतो याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.रुग्णवाहिकेचा परवाना निलंबनाचा पाठविला प्रस्तावशहर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेतल्यानंतर ज्या रुग्णवाहिकेतून ही महिला वर्ध्यात पोहोचली, त्या रुग्णवाहिकेचा परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनासह उपप्रादेशिक परिवहन विभागाला पाठविला आहे. सदर लेखी प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा अनेक रुग्णवाहिका असून त्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येत आहेत. त्याची तपासणी करणाºया यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस