लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील मासोद वनपरिक्षेत्रात अलीकडेच पार पडलेल्या वन्यप्राणी प्रगणणेत वाघाचे दर्शन झाल्याची माहिती या गणना कार्यक्रमात सहभागी झालेले महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष सुनिल ढाले यांनी दिली आहे.बुध्द पोर्णिमेला भारतात दरवर्षी वन्यप्राणी प्रगणना केली जाते. हा राष्ट्रीय उपक्रम असल्याने या उपक्रमात विविध सामाजिक संघटना सहभागी होतात. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील मासोद वनपरिक्षेत्रात ढगा येथे बांगडापूरचे वनरक्षक डी.बी. मसराम, वनमजूर व्ही.सी. खडसे यांच्या समावेत सुनिल ढालेही सहभागी झाले होते. या परिसरात निळकंठ पक्षी तसेच चार-पाच हरणाचे कळप याशिवाय रोही, नीलगाय आदी दिसून आले. अस्वल, मोर, लांडोर यांचेही प्रगणणेच्यावेळी दर्शन झाले, याशिवाय पट्टेदार वाघाचेही दर्शन या भागात झाले, अशी माहिती त्यांनी दिली. या भागात रानडुकरे, रानकोंबडे, रानकुत्रे मोठ्या प्रमाणावर आढळले, असे सुनिल ढाले यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी वन्यप्रेमी संजय इंगळे तिगावकर, दिलीप विरखेडे, राजेंद्र लांबट, वर्षा ढोमणे, आशिष पोहाणे, गिरीष बोकडे आदींनी मासोद परिसराला भेट दिली.
मासोद वनपरिक्षेत्रात प्रगणणेत पट्टेदार वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:00 IST
कारंजा तालुक्यातील मासोद वनपरिक्षेत्रात अलीकडेच पार पडलेल्या वन्यप्राणी प्रगणणेत वाघाचे दर्शन झाल्याची माहिती या गणना कार्यक्रमात सहभागी झालेले महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष सुनिल ढाले यांनी दिली आहे.
मासोद वनपरिक्षेत्रात प्रगणणेत पट्टेदार वाघाचे दर्शन
ठळक मुद्देअंनिस कार्यकर्त्यांचा उपक्रमात सहभाग