अल्लीपूर : ग्रामिणांच्या सुविधेसाठी स्थानिक भागातील तंटे लोक न्यायालयांतर्गत तात्काळ मार्गी लागावे व न्यायदान प्रक्रिया जलद व्हावी या उद्देशाने अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत ४१ गावासाठी गांधी जयंती दिनी अल्लीपूर येथे ग्राम न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या न्यायमुर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते जिल्हा सत्र न्यायाधिन संध्या रायकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हिंगणघाट वकील संघाचे अध्यक्ष व अल्लीपूर ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश स.दा. गरड उपस्थित होते. संचालन एच.जी. अग्रवाल यांनी केले तर आभार गरड यांनी मानले. यआवेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी, सरपंच मंदा पारसरे, उपसरपंच रामा धनवीज उपस्थित होते.(वार्ताहर)
अल्लीपूर येथे ग्रामन्यायालय सुरु
By admin | Updated: October 5, 2015 02:16 IST