शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:49 IST

आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते.

ठळक मुद्देआमगाव (खडकी) येथील रसायनयुक्त पाणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमगाव (खडकी) येथे वर्धा-नागपूर महामार्गावर सामाजिक वनीकरणजवळील नाल्यात अज्ञात टँकरमधील रसायन सोडल्याने पाणी दूषित झाले होते. यामुळे असंख्य सांप आणि मासोळ्या मृत्युमुखी पडले होते. याची सूचना तहसीलदारांना देताच त्यांनी गावाला भेट देत ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया विहिरी व हातपंपाचे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल येईस्तोवर पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सांगितले. आता आठ दिवस लोटूनही गावातील पाणीपुरवठा ठप्पच आहे.पाण्याचे नमून पाठवून आठ दिवस लोटलेत; पण अद्यापही प्रयोगशाळेकडून पाण्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. गावात दोन टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे; पण टँकरचे पाणी अपूरे पडत असल्याने पाण्यासाठी दाही दिशा, अशी अवस्था झाली आहे.या घटनेनंतर सलग पाच दिवस सेलूचे तहसीलदार सोनवणे, ठाणेदार ब्राह्मणे, पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जि.प. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागाचे बुंदेले, विस्तार अधिकारी पं.स. सेलू, जि.प. सदस्य विनोद लाखे, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, महिला व बालविकास सभापती सुनीता कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे सेलू, आरोग्य विभागाचे अधिकारी आदींनी आमगाव येथे भेट दिली. या पदाधिकाºयांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील देण्यात आली. अद्यापही प्रयोगशाळेकडून पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रा.पं. पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंदच आहे. ग्रामस्थांना दोन टँकरच्या माध्यमातून तात्पूरता पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याने तहाण भागत नसल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय पशु पालकांसमोर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यामुळे सध्या आमगाव येथील नागरिकांचे लक्ष पाणी अहवालाकडे लागले आहे. आणखी किती दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी