शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

दक्षता समितीच अदक्ष

By admin | Updated: December 24, 2014 23:03 IST

दलित अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हास्थळावर शासनाच्या निर्देशाने दक्षता समिती गठित करण्यात आली. या समितीच्या वर्धेत एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांत केवळ दोनदाच सभा झाल्या.

जिल्ह्यात दोनच बैठका : आयुक्तांनी मागविला अहवालश्रेया केने - वर्धादलित अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हास्थळावर शासनाच्या निर्देशाने दक्षता समिती गठित करण्यात आली. या समितीच्या वर्धेत एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांत केवळ दोनदाच सभा झाल्या. यामुळे ही समिती किती दक्ष आहे हे दिसून येते. जिल्ह्याच्या समितीने यंदाच्या वर्षात केवळ दोन सभा घेतल्याचे दक्षता व नियंत्रण समितीच्या नागपूर येथे झालेल्या विभागीय बैठकीत उघड झाले. यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात अहवाल मागविल्याची माहिती आहे.नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीच्या अहवालानुसार वर्धा या दलित अत्याचाराला प्रतिबंध लावण्यात ‘मागास’ असल्याचे समोर आले. विभागात नागपूर जिल्ह्याने सहा, चंद्रपूर व गोंदिया पाच, गडचिरोलीने सात सभा घेतल्या आहेत. नागपूर विभागात ८५ टक्के गुन्हे तपासात आहेत. वर्धा जिल्ह्यात १९८९ ते आॅक्टोबर २०१४ पासून ८०२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यापैकी पोलीस तपासात १४ प्रकरणे आहेत. न्यायप्रविष्ट केलेल्या ७४९ पैकी ६७० प्रकरणांचा निकाल लागला, तर याप्रकरणी ६४ जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.