शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:46 IST

सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी आर्वी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देवामनराव चटप : ‘विदर्भ राज्य द्या, नाहीतर चालते व्हा’चा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्या, अन्यथा चालते व्हा, यासाठी विदर्भभर २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी आर्वी येथे पत्रकार परिषदेत दिली.चटप पुढे म्हणाले, सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने विदर्भ राज्य देण्याचे स्पष्ट आश्वान दिले होते. केंद्रात भाजपाची सत्ता आल्यावर विदर्भ राज्य निर्माण करू असे त्यावेळी सांगितल्या जात होते. विदर्भातून ४४ आमदार भाजपाचे निवडून आले आहे. महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे. मात्र, भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. ही वैदर्भीय जनतेशी बेईमानी आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा विदर्भ राज्य आमच्या अजेंड्यावर नाही, असे सांगत आहे. त्यामुळे आता भाजपाला जाब विचारण्यासाठी २ ते १२ जानेवारी या कालावधीत विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढण्यात आली आहे. विदर्भातून चालते व्हा, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झाला असून सहा जिल्हे फिरून ही यात्रा १२ जानेवारीला नागपूर येथे पोहोचेल. येथे यात्रेचा समारोप जाहीर सभेने होईल. विदर्भात सर्व विदर्भवादी पक्ष व संघटना एकत्रित आल्या असून विदर्भ निर्माण मंचाची स्थापना करण्यात आल्याचेही याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक अ‍ॅड. राम नेवले, माजी आमदार सरोज काशीकर, रंजना आमडे, शैला देशपांडे, अ‍ॅड. दिलीप काळे, माजी नगराध्यक्ष वसंत गुल्हाणे, सुधीर देशमुख, धीरेंद्र शेट्ये, दिलीप भोयर, घनश्याम पुरोहित, धोंडबा गावंडे, मुकुंद, रवींद्र आगरकर, मिलिंद देशपांडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ