शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वरुणराजा विसरला वर्ध्याची वाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:35 IST

यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यात केवळ ७४.९७ मि.मी. पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्ध्याचा पारा ४७.९ पर्यंत चढला होता. त्यामुळे वेळीच मान्सून दाखल होऊन दमदार पाऊस जिल्ह्यात होईल, असा कयास अनेकांकडून बांधला जात होता. मात्र, जून महिन्याचे पंधरा दिवस लोटूनही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्याने वरुणराजा वर्ध्याची वाट तर विसरला नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये होत आहे. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळीच पाऊस न आल्यास याचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आहे.प्राप्त माहितीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ८८९.४० मिमी, सेलू तालुक्यात ९५९.६२ मिमी, देवळी तालुक्यात ९५९.६२ मिमी, हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मिमी, समुद्रपूर १००१.६२ मिमी, आर्वी तालुक्यात ८५०.३० मिमी, आष्टी तालुक्यात ८६४.७२ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ८६४.७२ मिमी पाऊस पडतो. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. परंतु, १ ते १५ जून या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात केवळ ७४.९७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, जून महिन्यात वर्धा तालुक्यात १६३.८० मि. मी. सेलू १८३.९० मिमी, देवळी तालुक्यात १८३.९० मिमी, हिंगणघाट तालुक्यात १५८.६० मिमी, समुद्रपूर १८३.५० मिमी, आर्वी तालुक्यात १५४.१० मिमी, आष्टी तालुक्यात १७१.७० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १७१.७० मिमी पाऊस पडतो; पण मागील काही दिवसात वादळीवाऱ्यासह नाममात्र झालेल्या पावसाने अनेकांच्या अडचणीत भरच टाकली. असे असले तरी पेरणीची कामे खोळंबली असल्याने शेतकऱ्यांना तर भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.६० टक्के आटोपली कपाशीची लागवडअल्लीपूर : परिसरात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ग्रामीण भागातील शिरूड, सिरसगाव, पवनी, अलमडोह, टाकळी दरणे, येरणवाडी, पिंपळगाव भागात कपाशी व तूर लागवड जवळपास ६० टक्के पूर्ण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस आल्यावरच लागवडीचा निर्णय घेतला आहे. रोहणी नक्षत्रात दमदार पाऊस न पडल्याने वाही न करताच शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर करून जमीन तयार केली. शिवाय, लागवड केली. काही भागात तुरळक पाणी झाल्याने कपासी लागवड वाया गेल्या आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडा होत आहे; मात्र पाऊसच रूसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मागीलवर्षी यावेळी डवरणी, खुरपणीच्या कामाला गती दिली जात होती. तर यंदा विपरित चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Rainपाऊस