शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

By महेश सायखेडे | Updated: October 6, 2023 19:03 IST

यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

वर्धा : काय मावशी... काय झाले... ताप आहे काय... रक्त तपासले काय अशी भावनिक साद घालत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या येळाकेळी येथील उषा खंगार या महिला रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून विविध विभागाची पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरूवातीला ट्रामा केअर युनिटची पाहणी केली. या विभागात महत्त्वाची ठरणारी सीआप मशीन नादुस्त असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगताच जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

त्यावर आयुक्तांकडे त्यासंदर्भाने पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने संबंधित मशीन रुग्णालयात कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागात जात तेथील सोई-सुविधांची पाहणी केली. शिवाय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात जात तेथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, औषध वितरण केंद्र आदीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे आदींची उपस्थिती होती.औषधसाठ्या विषयी केली विचारणाजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अस्थिरोग विभाग व ट्रामा केअर युनिटची पाहणी केल्यावर थेट औषधी वितरण केंद्र गाठले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या रांगेत उभे राहून औषधांचे वितरण करणाऱ्यांना औषधसाठा आहे काय असे म्हणत उपलब्ध औषधसाठ्याबाबत विचारणा केली. इतकेच नव्हे तर औषध घेत असलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला.डॉ. गाठे यांनी दिली एसएनसीयूची माहितीबालरोग विभाग आणि एसएनसीयूचे प्रमुख डॉ. संजय गाठे यांनी एसएनसीयूतील सोई-सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना एसएनसीयूमध्ये दाखल असलेल्या नवजात बालके, रेफरीन आणि रेफर आऊट नवजात बालकांविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याच ठिकाणी स्वत:च्या कुटुंबाला दुय्यम स्थान देत रुग्ण सेवा देणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.स्वच्छते बाबत व्यक्त केले समाधानजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केल्यावर जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याच्या कारण स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून येथील आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने सर्वांनाच मोफत आरोग्य सेवा केल्याने १५ ऑगस्टपासून रुग्णालयातील ओपीडी संख्येत वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या आणि उपलब्ध औषधसाठा याबाबतचीही माहिती आपण आज जाणून घेतली. शिवाय रुग्णांना उत्तम शासकीय आरोग्य सेवा मिळतेय काय याची रुग्णांशी संवाद साधून शहानिशा केली. जिल्हा रुग्णालयात मुबलक औषधसाठा आहे.- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धाwardha-pcवर्धाhospitalहॉस्पिटल