शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान'चे अपडेट् केले; ७० वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:58 IST

Vardha : शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. मात्र, याच योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेचे खाते अपडेट करा, म्हणून लिंकचा मेसेज येतो, आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खातेच रिकामे होत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत. त्यामुळे या फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली आपले खाते अपडेट करा, आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का तपासा, तुमचा अडकलेला हप्ता मिळवा, अशा एक ना अनेक प्रकारच्या मेसेजमधून अशी एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये अप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होऊन बंद पडते. अशा प्रकारे फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या लिंकपासून वेळीच सावध व्हावे, कोणतेही मेसेज आणि लिंक आल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. 

ई-केवायसीच्या नावे फसवणूक पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ई-के- वायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणताही कॉल, मेसेज किंवा कोणतीही अनोळखी लिंक आली असेल तर चुकून ही त्यावर क्लिक करु नका, अन्यथा फसवणूक करणारे तुमची फसवणूक करु शकतात.

काय काळजी घ्याल ? या योजनेंतर्गत अनेक शेतकरी आहेत ज्यांना मागील हप्त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. यामागे कारणे असू शकतात. मात्र, जर कुणी तुम्हाला हप्ता मागितला आणि त्याबदल्यात तुमच्याकडून पैसे घेतले तर तुम्ही सावध व्हा, कारण असे लोक तुमच्याकडून पैसे घेतात. आपली गोपनीय बैंकिंग माहिती देणे टाळा. तरच अशा फसवणुकीपासून तुम्ही वाचाल.

सायबरकडे नऊ महिन्यांत ८० वर तक्रारीजानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधी पीएम किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तब्बल ८० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केली, तर काहींची किरकोळ स्वरुपात रक्कमही गेल्याने त्यांनी तक्रार देण्यास टाळले. मात्र, ही फसवणूक सध्या वाढतच चालली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीwardha-acवर्धा