लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नगर पालिकेच्या तीन कर्मचाºयांवर शिवीगाळ करून मारहाण केल्याचा चुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर आहे. जोपर्यंत निलंबन मागे घेण्यात येणार नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती नगर पालिका कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय अंभोरे यांनी आर्वी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.गेल्या तीन महिन्यांपासून नगर पालिका कर्मचाºयांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे कर्मचारी खूप अडचणीत सापडलेले आहेत. अशाही परिस्थितीत आपले काम ते सातत्याने करीत आहेत. तरीसुद्धा नगर पालिका कर्मचाºयांना भर चौकात शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले, ही बाब निंदनिय आहे. २०१५-१६ ला कर विभागातील कर्मचाºयांवर वसुलीचे काम होते. वसुलीची लाखो रूपयांची थकबाकी त्यावेळी वसुल करण्यात आली होती. थकबाकी कोणत्या हिशेबाने काढण्यात येते हे विद्यमान कमिटीला माहित नाही. खरोखर अपहार झाला असेल तर शासनाने आॅडीट करून अधिकाºयांकडून त्याची शहानिशा करून घ्यावी. त्यातून सत्य बाहेर येईल, असे अंभोरे याप्रसंगी म्हणाले.तीनच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्वच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करावी. व पदाधिकाºयांनी स्वत: नगर पालिकेच्या कारभार चालवावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. कर्मचाºयांचे थकीत असेले तीन महिन्याचे व सेवानिवृत्त कर्मचाºयांचे वेतन तसेच १२ वर्षांची कालबद्ध पदोन्नती बकाया रक्कम, सेवानिवृत्तीची थकबाकी रक्कम तत्काळ देणे गरजेचे आहे. त्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेत अंभोरे यांनी केला. पत्रकार परिषदेला पालिकेचे कामगार उपस्थित होते.
निलंबन मागे घेतल्याशिवाय काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:24 IST
नगर पालिकेच्या तीन कर्मचाºयांवर शिवीगाळ करून मारहाण केल्याचा चुकीचा आरोप करण्यात आला आहे.
निलंबन मागे घेतल्याशिवाय काम नाही
ठळक मुद्देनगर पालिका कामगार संघटना आक्रमक : आर्वी नगर पालिकेतील मारहाण प्रकरण