१५ वर्षांपासूनची परंपरा : वरुड(रेल्वे) येथून केला प्रारंभसेवाग्राम : ‘भेटी लागे जीवा लागलीया आस’ या ओवीप्रमाणे वरूड(रेल्वे) येथील वारकरी महाराष्ट्राचे आद्य दैवत विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त निघाले आहे. या सायकलवारीला १५ वर्षाची परंपरा असून ही वारी शिर्डी मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. सायकलवारीत २० वारकऱ्यांचा सहभाग आहेत. या वारीची सुरूवात मंगळवारी आ. डॉ. पंकज भोयर यांनी हिरवी झेंडी दाकहवून केली. यावेळी ग्रामस्थांनी वारकरी मंडळीचा सत्कार केला. सायकलने प्रत्येक दिवशी १७ तासाचा प्रवास करणार असून ते कळंब, देवकारंजा, औंढानागनाथ, बारशिव मारोती, त्रिधारपती, आळंदी, शनिशिंगनापूर, शिर्डी, घृश्णेश्वर, भद्रा मारोती, शेगाव, अमरावती या धार्मिक स्थळाला भेट देणार आहे. यात महादेव लोहांडे, विनोद जुमडे, बळीराम बावणे, प्रमोद खेडेकर, संजय ठाकरे, निवृत्ती आटे, विनोद बारहाते, प्रल्हाद शेळके, कैलास न्याहारे, नरेश राऊत, एकनाथ वडाळकर, आशिष डाखोळे, अनिल कोसुळकर, कैलास कुमरे, राजेंद्र सहारे, प्रमोद पाबळे, गोलू कुकडे, मुरलीधर पांडे यांचा सहभाग आहे. सत्कार कार्यक्रमाला जि.प. सदस्य सुनिता ढवळे उपस्थित होत्या. वारकऱ्यांना उच्च प्राथमिक शाळा, वरूड तर्फे प्रवासात लागणारे साहित्य देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अनिल कुकडे यांनी वारकऱ्यांना मोफत गणवेष दिले. कार्यक्रमाला सरपंच संजय भोयर, उपसरपंच नगराळे, ज्येष्ठ नागरिक, मारोती मंदिराचे अध्यक्ष प्रसाद देशमुख, भजन मंडळी आणि गावकऱ्यांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)
विठ्ठलाच्या भेटीला निघाली अनोखी सायकलवारी
By admin | Updated: October 1, 2015 02:55 IST