सद्भावना संस्थेच्या जलसंधारण कामांची केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:24 AM2017-11-17T00:24:46+5:302017-11-17T00:25:02+5:30

अ‍ॅग्रो व्हीजन येथे सद्भावना ग्रामीण विकास संस्था व पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने उभारलेल्या कक्षाला केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली.

Union Minister takes over the water conservation works of Sadbhavna Sansthan | सद्भावना संस्थेच्या जलसंधारण कामांची केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल

सद्भावना संस्थेच्या जलसंधारण कामांची केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अ‍ॅग्रो व्हीजन येथे सद्भावना ग्रामीण विकास संस्था व पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने उभारलेल्या कक्षाला केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले.
सद्भावना संस्थेद्वारे साटोडा व महाकाळ येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सीएसआर फंडातून नाला खोलीकरण, गॅबीयन स्ट्रक्चर बंधारे, शेतकºयांसाठी ओलांडणी पूल, माती संवर्धनासाठी वृक्षारोपण आदी कामे करण्यात आली. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली. ओलित क्षेत्र वाढले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भगत यांनी मंत्र्यांना दिली. मंत्री द्वयांनी संस्थेने केलेल्या कामाचे कौतुक केले. तामसवाडा येथेही संस्थेने यापूर्वी जलसंधारणाचे काम केले. विदर्भातील शेतकरी, खासदार, आमदार आदींनी या कक्षाला भेटी दिल्या. यावेळी पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष दत्ता जामदार, माधव कोटस्थाने, मिलिंद भगत आदी उपस्थित होते.

Web Title: Union Minister takes over the water conservation works of Sadbhavna Sansthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.