शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:14 IST

येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देबारा दुचाकी जप्त : तळेगाव (श्या.पं.) पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्यालाअटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस आता दुचाकींच्या चेचीस नंबरवरुन मुळ नंबरचा शोध घेत आहे.प्राप्त माहितीनुसार इमरान खॉ उर्फ सोनू दिलावर खॉ पठाण (२५) रा. काजीपुरा, आष्टी असे आरोपीचे नाव आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवासा तालुक्यातील भारवाडी (ठाणाठुणी) येथील विनोद मंगल खाकसे एम. एच. २७ ए.एन. ४७३२ क्रमांकाच्या दुचाकीने भाच्याला सोडण्याकरिता तळेगांव (श्या.पं.) येथील बसस्थानकावर आले होते. बस यायला उशिर असल्याने त्यांनी बसस्थानक परिसरातील साईबाबा मंदिरासमोर दुचाकी उभी करुन चहा पिण्याकरिता गेले असता त्यांची दुचाकी चोरट्याने लंपास केली. यासंदर्भात विनोद खाकसे यांनी ६ डिसेंबरला तळेगाव पोलिसात तक्रार नोंदविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करित असताना आष्टी येथील इमरान उर्फ सोनू याने ही दुचाकी चोरली असून तो नागपुरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे निलेश पेटकर, विजय उईके, रोशन धाये यांनी नागपूर गाठले. नागपुरात आरोपीच्या शोधात दोन दिवस तळ ठोकला. रात्रीच्या सुमारास आरोपीचा शोध घेतांना तो आष्टीमार्गे मोर्शीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना तांत्रिक तपासावरुन मिळाली. लगेच नागपुरात असलेल्या पथकाने त्याचा पाठलाग करुन १५ जानेवारीला रात्री चोरीस गेलेल्या एम.एच.२७ ए.एन.४७३२ क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने परिसरातील पाच गुन्हाची कबुली दिली. तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यातूनही सात दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्व गुन्हातील १२ दुचाकी जप्त केल्यात. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात तळेगावचे पोलीस निरीक्षक रवी राठोड, पोलीस उपनिरिक्षक प्रदीपकुमार राठोड, नीलेश पेटकर, सचिन साठे, विजय उईके, रोशन धाये, कुलदीप टांकसाळे, देवेंद्र गुजर, अमोल इंगोले, प्रवीण रोहाड यांनी केली.

टॅग्स :ThiefचोरArrestअटक