लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : कुठलीही परवानगी न घेता झुडपी जमिनीवर नांगरणी करणाºया शेतकºयास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर नांगरणीकरिता वापरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. वनविभागाच्या चमूने शनिवारी छोटी (आर्वी) येथे ही कारवाई केली.शेतकरी भोजराज नारायण डेकाटे कुठलीही शासकीय परवानगी न घेता शेतीकरिता समुद्रपूर तालुक्यातील छोटी (आर्वी) येथे वनविभागाच्या झुडपी जमिनीवर नांगरणी करीत होते. या घटनेविषयी माहिती मिळताच वनविभागाचे वडनेर क्षेत्र सहाय्यक सचिन कापकर, अल्लीपूरचे वनरक्षक यू. एल. पवार, वनरक्षक अमोल पिसे कारवाई करून एमएच ३४ डी ४६३० क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला. शेतकरी डेकाटे यांच्याविरुद्ध वनअधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बनसोड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक सचिन कापकर करीत आहेत.
झुडपी जमिनीवर विनापरवानगी नांगरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST
शेतकरी भोजराज नारायण डेकाटे कुठलीही शासकीय परवानगी न घेता शेतीकरिता समुद्रपूर तालुक्यातील छोटी (आर्वी) येथे वनविभागाच्या झुडपी जमिनीवर नांगरणी करीत होते. या घटनेविषयी माहिती मिळताच वनविभागाचे वडनेर क्षेत्र सहाय्यक सचिन कापकर, अल्लीपूरचे वनरक्षक यू. एल. पवार, वनरक्षक अमोल पिसे कारवाई करून एमएच ३४ डी ४६३० क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला.
झुडपी जमिनीवर विनापरवानगी नांगरणी
ठळक मुद्देशेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल : वनविभागाची कारवाई