लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील एकपाळा येथून अनधिकृत बीटी बियाण्यांचे ३६ पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई गुणनियंत्रण जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने बुधवारी केली.गुणनियंत्रण जिल्हास्तरीय भरारी पथकाला एकपाळा येथे बनावट बिटी बियाणे असल्याची माहिती मिळाली. यावरून तालुकास्तर भरारी पथकाला सोबत घेत एकपाळा शिवारात शंकर रामाजी झिलपे रा. एकपाळा यांच्या घरी धाड टाकण्यात आली. यात एक किलोची ३६ प्लास्टिकची पाकिटे अनधिकृत कपाशी बिटी बियाणे आढळून आले. या पॅकेटवर कुठल्याही कंपनीचे लेबल नाही. त्यावर लॉट नंबर नाही. वैधता मुदत आदी बयाणे कायद्यात समाविष्ट बाबी निदर्शनास आल्या नाहीत. शिवाय संबंधित शेतकऱ्याने अनधिकृत साठा करणे हे नियमाबाह्य असल्याने भरारी पथकाने ३६ पॅकेट जप्त केले. संबंधितावर देवळी पोलिसांत गुन्हाही नोंदविण्यात आला ही कारवाई कृषी विकास अधिकारी आर.पी. धर्माधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रमोद म्हैसकर, प्रशांत भोयर, आर.टी. राऊत, आर. आर. शेंडे, अनिल सांगळे आदींनी केली.
अनधिकृत बीटी बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:31 IST
तालुक्यातील एकपाळा येथून अनधिकृत बीटी बियाण्यांचे ३६ पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई गुणनियंत्रण जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने बुधवारी केली.
अनधिकृत बीटी बियाणे जप्त
ठळक मुद्देजिल्हा व तालुकास्तर भरारी पथकाची कारवाई : ३६ पॅकेट हस्तगत