लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हिंदी विश्व विद्यापीठाने उमरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या १ कोटीवर अधिक रक्कमेचा कर मागील १२ वर्षांपासून भरणा केलेला नाही. त्यामुळे उमरी (मेघे) गावाचा विकास रखडलेला आहे. ग्रामस्थ यामुळे संतप्त असून या ग्रामपंचायतीचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे.एच.डी. देवेगौंडा पंतप्रधान असताना वर्धा येथे हिंदी विश्व विद्यापीठाची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आले. तेव्हापासूनच उमरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत या विद्यापीठाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतींने विद्यापीठ व्यवस्थापनाला गृहकर भरण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. परंतु आम्ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारी संस्था असल्याने कर लागत नाही. असा युक्तीवाद करीत विद्यापीठ प्रशासनाने कराचा भरणा करण्यास नकार दिला. त्यानंतर उमरी (मेघे) ग्रामपंचायतीने विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे या प्रकरणी दाद मागितली. आयुक्तांनी ग्रामपंचायतींला कराचा भरणा करावाच लागेल. असे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला दिले. विद्यापीठ प्रशासनाने १९९७ पासून २०१६-१७ पर्यंतचा कर दिला नाही. या कराचा रक्कम १ कोटीच्या वर आहे. यावर्षी मात्र २०१७-१८ करापोटी २ लाख ४१ हजार रुपये उमरी (मेघे) ग्रामपंचायतीला विद्यापीठाने दिले. मागील १२ वर्षांपासून कर थकीत असल्यामुळे या लहान ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर प्रचंड परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांचीही ओरड होते. अलीकडे विद्यापीठाने आम्ही केंद्र सरकारकडे या बाबत निधी मागीतला असल्याचे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला कळविले आहे. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी विठ्ठल इवनाथे यांनी लोकमतशी बोलताना दिली.२००६-०७ पासून हिंदी विश्व विद्यापीठाने ग्रामपंचायतकडे गृह कराचा भरणा केलेला नाही. दरवर्षी मागणी केली जाते. यंदा त्यांनी २०१७-१८ या वर्षांचा २ लाख ४१ हजार रुपयांचा कर भरणा केला आहे. उर्वरीत कर अजूनही त्यांच्याकडे थकबाकी आहे.विठ्ठल इवनाथे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत , उमरी (मेघे)
हिंदी विश्व विद्यापीठामुळे उमरी गाव अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:12 IST
केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हिंदी विश्व विद्यापीठाने उमरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या १ कोटीवर अधिक रक्कमेचा कर मागील १२ वर्षांपासून भरणा केलेला नाही. त्यामुळे उमरी (मेघे) गावाचा विकास रखडलेला आहे.
हिंदी विश्व विद्यापीठामुळे उमरी गाव अडचणीत
ठळक मुद्देतपापासून थकविला १ कोटीचा कर : आयुक्तांच्या सूचनेनंतरही स्थिती कायम