ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील महाविद्यालयातून महागडी दुचाकी वाहने लंपास करून ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे विकणाऱ्या अमरावतीच्या चोरट्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. ही कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेशन पथकाने केली.या चोरट्याला वर्धेत आणून पोलिसी हिसका दाखविताच त्याने जिल्ह्यातून बुलेटसह अनेक महागड्या गाड्या चोरल्याचे कबुल केले. त्या गाड्या जप्त करण्याची कारवाई रामनगर पोलिसांकडून सुरू आहे.आलोडी येथील राहुल मानेकर (३१) यांची एमएच ३२ व्ही ३६३७ क्रमांचा दुचाकी पिपरी येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरातून चोरी झाल्याची तक्रार रामनगर ठाण्यात करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील चोरीची दुचाकी विक्री झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तिवसा गाठत तपास केला. या तपासात गिरीष सोळंके (३२) रा. विलासनगर, अमरावती याने या गाड्या विकल्याचे सामोर आले. त्यावरून त्याचा शोध घेत गिरीषला नाशिक येथून अटक केली. त्याच्याजवळून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय मगर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव, हवालदार सुनील भगत, आकाश जुमडे, संतोष कुकडकर, नरेंद्र कांबळे यांनी केली.चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना अटकवर्धा- रस्त्याने पायी जात असलेल्या इसमाला चाकुचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाने अटक केली. त्यांच्याजवळून चाकू व चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. प्रविण मोहन कांबळे रा. एफसीआय झोपडपट्टी व सुरज संतोष फुलझले रा. बरबडी अशी अटकेती आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सूत्रानुसार, विशाल ठाकरे (३०) रा. प्रतापनगर यांना दोन युवकांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. त्यांच्याजवळूल एकूण १४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता ठाकरे यांचा मोबाईल राजु प्रधान रा. महसुलनगर, बरबडी हा वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे राजु प्रधान याला विचारणा केली असता प्रविण कांबळे व सुरज फुलझले या दोघांनी त्याला हा मोबाईल दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून चाकू, चोरीचे मोबाईल व दुचाकी जप्त केली.महागड्या गाड्या चोरण्याकडे विशेष लक्षअटकेत असलेला चोरटा छोट्या दुचाकी कमी तर महागड्या दुचाकी अधिक चोरत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. य दुचाकी जप्त करणे अद्याप बाकी आहे.
दुचाकी चोराला नाशिक येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:19 IST
येथील महाविद्यालयातून महागडी दुचाकी वाहने लंपास करून ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे विकणाऱ्या अमरावतीच्या चोरट्याला नाशिक येथून अटक करण्यात आली.
दुचाकी चोराला नाशिक येथून अटक
ठळक मुद्देतब्बल १७ वाहने चोरल्याची कबुली : तिवसा होते दुचाकी विक्रीचे मुख्य केंद्र