लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील पुलगाव मार्गावर निजामपूर फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तीन जण जखमी झाले. अपघात झाल्याचे या मार्गाने प्रवास करीत असलेल्या आ. अमर काळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपले वाहन थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, सोरटा येथील राजू भगत आणि त्यांची मुलगी विरुळ येथे बँकेच्या कामाकरिता येत होती. दुचाकी निजामपूर शिवारात आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या दुचाकीवर रामपूर येथील सुखदेव बुरबुटे व त्याचा एक साथीदार होता. या अपघातात राजू भगत, दिनेश बुरबुटे आणि दिनेशचा साथीदार गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर जखमी घटनास्थळच पडून होते. याच दरम्यान आ. अमर काळे हे याच मार्गाने पूलगाव येथून आर्वीच्या दिशेने परत येत असताना अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आपले वाहन थांबवून जखमींना आर्वी येथील रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अजीत शिंदे, जमादार सागर गीरी करीत आहेत.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:57 IST
येथील पुलगाव मार्गावर निजामपूर फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तीन जण जखमी झाले. अपघात झाल्याचे या मार्गाने प्रवास करीत असलेल्या आ. अमर काळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपले वाहन थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक
ठळक मुद्देतिघे गंभीर : मदतीसाठी आमदार धावले