शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात २९ हजारांच्या ‘एमडी ड्रग्ज’सह दोन तस्कर जेरबंद

By चैतन्य जोशी | Updated: March 4, 2023 18:47 IST

क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई : १.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वर्धा : वर्ध्यात २८ हजार ९५० रुपये किंमतीचा ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोन तस्करांना पोलिसांनी अटक केली. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही वर्ध्यात पहिली मोठी कारवाई असून पोलिसांनी दुचाकीसह मोबाईल असा एकूण १ लाख १३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई क्राईम इंटेलिजन्स पथकाने आनंदनगर परिसरात ३ रोजी रात्रीच्या सुमारास केली. सुफीयान कैसरोद्दीन शेख (२२) रा. इतवारा बाजार, मुन्ना उर्फ राजन थूल रा. आनंदनगर अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहे.

आनंदनगर परिसरात एक व्यक्ती दुचाकीने एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आनंदनगर परिसरात जात पाहणी केली असता एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. तो एका दुचाकीवर बसून होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सुफीयान शेख असे नाव सांगितले. त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिकच्या पारदर्शक पाकिटात उग्र वास येणारी पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आली. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक करुन ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्ज, तीन मोबाईल, एक दुचाकी असा एकूण १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबाेळकर, सागर भोसले, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, पवन देशमुख, राकेश इतवारे, धिरज राठोड, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.

‘मुन्ना’चालवायचा रॅकेट...

क्राईम इंटेलिजन्स पथकाने ड्रग्ज विक्री करणारा सुफीयान याला अटक करुन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एमडी ड्रग्ज आनंदनगर येथील रहिवासी मुन्ना उर्फ राजन थुल याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले. मुन्ना हा घरातुनच एमडी ड्रग्ज विक्रीचा गोरखधंदा चालवित होता. पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारुन १४ प्लास्टिक पाकिटं जप्त करुन ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी