शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या प्रियकराचा मुलांनीच काढला काटा; तिघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 15:32 IST

करंजी (भोगे) येथील हत्याप्रकरणाचा उलगडा

वर्धा : सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करंजी (भोगे) येथील रहिवासी अरुणकुमार थूल याला तिघांनी जीवे ठार मारले होते. ही घटना ६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. तेव्हापासून आरोपी फरार होते. मात्र, तब्बल २० दिवसांनी सेवाग्राम पोलिसांनी अरुणकुमारच्या मारेकऱ्यांना अटक केली असून दोन भावंडांसह एकास बेड्या ठोकल्या. आईचे अरुण सोबत अनैतिक संबंध असल्याने दोन्ही भावंडांनी एका मित्रासह अरुणकुमारला ठार मारल्याची कबुली आरोपींनी दिली.

पोलिसांनी अटक केलेल्यात अजय सुनील शेंडे (३०), रोशन सुनील शेंडे (२८) रा. भैसारे लेआऊट कामठवाडा सेवाग्राम आणि गौरव गोविंद कापटे (२५) रा. वरुड यांचा समावेश असून त्यांना सेवाग्राम येथून अटक करण्यात आली.

सिद्धार्थ दमडुनी थूल हा त्याच्या घरी असताना ६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास माजी पोलीस पाटील धनराज बलवर यांनी फोनद्वारे त्याचा भाऊ अरुणकुमार थूल याला अज्ञातांनी जबर मारहाण करुन ठार मारल्याची माहिती दिली. सिद्धार्थ याने घरी जाऊन पाहिले असता बेडरुमचा लाकडी दरवाजा तुटून खाली पडलेला दिसला. तसेच अरुणकुमार रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसून आला. अरुणकुमारच्या डोक्याला गंभीर जखमा होत्या. बाजूलाच दारुच्या शिशीचे तुकडे व एक लाकडी दांड्याचा तुटलेला तुकडा पडून दिसला. सिद्धार्थ याने याबाबतची तक्रार सेवाग्राम पोलिसात दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याची दखल घेत अरुणकुमारच्या तिन्ही आरोपींना शोधून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटेकार, हरिदास काकड, गजानन कठाणे, पवन झाडे, अभय इंगळे व सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा