वायगाव व वर्धा येथील घटना : वाहन चालकांवर गुन्हा दाखलवर्धा : वर्धा आणि वायगाव येथे झालेल्या अपघाताच्या दोन घटनांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. दोन्ही अपघात बुधवारी झाले. याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला. वायगाव मार्गावरील राधास्वामी सत्संगजवळ भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. देवीदास सोनवणे (४८) रा. सेलूकाटे, असे जखमीचे नाव आहे. सोनवणे हा दुचाकी एम.एच. ३२ टी. ६२८९ ने वायगाव येथून सेलूकाटेकडे जात असताना हा अपघात झाला. चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची माहिती आहे. जखमीला वर्धा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शहरातील उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. धर्मेंद्र कोलते (२७) रा. हिमालय विश्व वर्धा असे जखमीचे नाव आहे. जखमीला त्वरित सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत शिवनाथ पंडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी ट्रक एमएच ३२ क्यू ४७६४ च्या चालकावर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर व देवळी पोलीस करीत आहे.
दोन अपघातात दोघे गंभीर जखमी
By admin | Updated: April 7, 2016 02:09 IST