लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर पहाटे ४ च्या सुमारास सपाटीकरणाच्या मशीनखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.या मार्गावर असलेल्या आंजी मोठी सुकळीबाईच्या दरम्यान असलेल्या मौजा आंजी मोठी येथे मुरूमाच्या सपाटीकरणाचे काम सुरू होते. पहाटेच्या अंधारात मशीनला उजेड दाखवणाऱ्या विठ्ठल रामकृष्ण भुजाडे (४२) रा. खरांगणा याच्यासह बाजूला उभ्या असलेल्या विलास महादेव दोंदीलकर (५०) यांच्या अंगावरून हे मशीन गेल्याने ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या अन्य मजुरांनी या दोघांना सेवाग्राम येथे नेले असता विठ्ठल भुजाडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर विकास दोंदीलकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दरम्यान हा मशीनचालक फरार झाला आहे. खरांगणा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पहाटेच्या अंधारात काम करताना मशीनखाली येऊन दोन मजूर ठार; वर्धा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 13:29 IST
वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामावर पहाटे ४ च्या सुमारास सपाटीकरणाच्या मशीनखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
पहाटेच्या अंधारात काम करताना मशीनखाली येऊन दोन मजूर ठार; वर्धा जिल्ह्यातील घटना
ठळक मुद्देआंजी मोठी येथे अपघात